आज (15 फेब्रुवारी) पंजाब किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs PBKS) संघात पंजाबच्या घरच्या मैदानावर सामना रंगला आहे. या सामन्यात पंजाब किंग्जची निराशाजनक कामगिरी झाली. प्रथम फलंदाजी करणारा पंजाब संघ 111 धावांवरच गारद झाला. यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात आले. याच्या अगदी आधी, पंचांनी सुनील नरेनची (Sunil Narine) बॅट तपासली. बॅट तपासल्यानंतर, पंचांनी त्याला त्या बॅटने खेळण्याची परवानगी नाकारली.
खरंतर, केकेआरचा डाव सुरू होण्यापूर्वी, सुनील नरेन आणि अंगकृष रघुवंशी यांच्या बॅटची तपासणी करण्यात आली. कोलकाताच्या डावापूर्वी, पंचांनी दोन्ही खेळाडूंशी संपर्क साधला. पंचांनी अंगकृषला परवानगी दिली. पण सुनील नरेनची बॅट नाकारण्यात आली. सुनील नरेनच्या बॅटमध्ये जास्त खोली होती. नियमांनुसार, ती 2.64 इंच किंवा 6.7 सेंटीमीटर असू शकते. पण नरेनच्या बॅटमध्ये जास्त खोली होती. बॅट मध्यभागी जाड होती. त्यामुळे पंचांनी त्याला त्या बॅटने खेळण्यास नकार दिला.
या हंगामात नरेनने आतापर्यंत केकेआरकडून 6 सामने खेळले आहेत. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 44 धावांची खेळी खेळली. यानंतर, त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धही 44 धावा केल्या. पण तो सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध काही खास कामगिरी करू शकला नाही. मुंबईविरुद्ध नरेनला खातेही उघडता आले नाही. त्याने लखनौविरुद्ध 30 धावा केल्या. पण पंजाबविरूद्धच्या सामन्यात तो केवळ 5 धावांवरतीच बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज मार्को यान्सेनने पव्हेलियनचा रस्ता दाखवला.