Latest Marathi News Updates: कटरा येथून काश्मीरला जाणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार
esakal April 16, 2025 03:45 AM
Vande Bharat: कटरा येथून काश्मीरला जाणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार

पंतप्रधान मोदी १९ एप्रिल रोजी कटरा येथून काश्मीरला जाणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात खटला दाखल केला

नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतरांविरुद्ध दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात खटला दाखल केला.

Pune Live : ससून रुग्णालयात रुग्णाचे हाल, व्हीलचेअरच उपलब्ध नाही

पुण्याच्या ससून रुणालयातील एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वार्डमधून उपचार करुन रुग्ण घसरत आला आहे. येताना रुग्णाला सोडायला व्हीलचेअर उपलब्ध नसल्याने रुग्ण घसरत रुग्णालयाबाहेर आला.

Mumbai Live : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

एक्सप्रेसमध्ये बिघाड पश्चिम रेल्वेच्या सफाळे आणि केळवे रोड रेल्वे स्थानकांदरम्यान बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे डहाणूकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल गाड्या २० ते २५ मिनिटं उशिराने धावत आहेत.

Mumbai Live: अंधेरीत भीषण आग, 5 गाड्या जळून खाक

मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातून एक भीषण आगीची घटना समोर आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील गुंदवली येथील महापालिकेच्या दवाखान्या मागील पार्किंगमध्ये अचानक आग लागली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 4 ते 5 गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.

Live: कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली

कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली.

हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे, या पुलाच्या बांधकामामुळे नवी दिल्ली ते काश्मीर थेट रेल्वे सेवा सुरू होईल.

Solapur Live: श्री बिरोबा महालिंगराया देवाचा यात्रा महोत्सव

सोलापूर: लष्कर येथील श्री बिरोबा व महालिंगराया देवाचा यात्रा महोत्सव शनिवार साजरा झाला. या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम झाले.

महोत्सवानिमित्त अभिषेक महापूजा, पालखी सोहळा व पालखी भेट, ओव्या, वीर खेळणे, महाप्रसाद वाटप कार्यक्रम झाले.

Patna Live: पुण्यातील उद्योगपतीचा बिहारच्या पाटण्यात खून

कोथरूडमधील ५५ वर्षीय उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे यांची गळा दाबून हत्या करण्यात आली असून, ही "सायबर मर्डर" असल्याची शक्यता आहे. आरोपींकडून कंपनीच्या टूल्स आणि मशिनरी स्वस्तात विकत देण्याचा मेल आल्याने ते बिहारमधील पाटण्यात गेले होते. तिथेच त्यांची हत्या झाली असून, काल त्यांचा मृतदेह सापडला. कुटुंबीयांनी कोथरूड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. हत्या नेमकी का झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ताफा थांबवुन रस्यावरील अपघात ग्रस्तांना आमदार बनसोडेंची मदत

१४ एप्रिल रोजी मतदार जळकोटला जात असताना जळकोट तालुक्यातील कोळनुर गावाजवळील मुख्य रस्त्यावर अचानक अपघात झाला. एका दुचाकीवर एक पुरुष आणि दोन महिला जखमी झालेले पाहून आमदार संजय बनसोडे यांनी तात्काळ त्यांचा ताफा थांबवला. आणि घटना स्थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेची वाट न पाहता स्वतःच्या गाडीतुन त्या जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात स्वत: फोन करून त्या जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सुचना दिल्या.

सेन्सर बोर्डाला आधी कॉमन सेन्स नव्हता का? फुले चित्रपटावरून आनंद दवे यांचा सवाल

फुले चित्रपटाबाबत सेन्सर बोर्डाने दिग्दर्शक आणि निर्मात्यांना काही सूचना दिल्या आहेत. मात्र, सेन्सर बोर्डाने आधीच कॉमन सेन्स वापरला असता आणि चित्रपट नीट पाहिला असता, तर हे बदल लवकर सुचवले गेले असते, असा संतप्त सवाल हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे. आमच्या भूमिकेनंतरच सेन्सर बोर्डाने प्रतिक्रिया दिली, डोळे आणि मेंदू उघडे ठेवून हे काम वेळेत केलं असतं, तर चित्रपट रिलीज होऊन आज आठवडा झाला असता, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Live : "तर शिवराज राक्षेवरील कारवाई मागे घेणार"- संदीप भोंडवे

महाराष्ट्र केसरीचे आयोजक संदीप भोंडवे यांनी शिवराज राक्षे प्रकरणावर भाष्य केलं. "...तर शिवराज राक्षेवर केलेली कारवाई मागे घेणार. 2 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली . या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे अशी कुस्ती झाली होती. या सामन्यात पंचाच्या निर्णयाने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पंधरा दिवस सोशल मीडियावर मोठा गोंधळ उडाला. आम्ही या सगळ्याला लक्षात घेऊन विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली.या कुस्ती सामन्याची चौकशी करण्याचे आदेश त्यांना दिले. 28 फेब्रुवारीला या समितीचा अहवाल मिळाला. मागच्या आठवड्यामध्ये कुस्ती संघाची ऑनलाईन बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्या पंचांची चूक आहे असे अहवालात निदर्शनास आले. त्यामुळे बैठकीमध्ये आम्ही पंच यांच्यावर तीन वर्षाची निलंबनाची कारवाई केली. महाराष्ट्रातील कुस्तीच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई. पण एकदा निकाल दिल्यानंतर तो बदलता येत नाही. यामध्ये पृथ्वीराज मोहोळची काही चूक नाही. पण पंचानी काय निर्णय द्यावा हा त्यांचा निर्णय असतो. महेंद्र गायकवाड यांनी निलंबन कारवाई मागे घेण्यासाठी पत्र दिलं होतं. त्याची कारवाई आम्ही मागे घेतली. परंतु शिवराज राक्षे यांनी अशा प्रकारचे पत्र दिलं नाही. त्यामुळे त्याच्यावरील कारवाई मागे घेता येणार नाही. जर त्यांनी पत्र दिलं आणि तर आम्ही निश्चितच सगळे सदस्य बसून कारवाई मागे घेण्याचा प्रयत्न करू"

Live : "धनंजय मुंडे यांची पूर्ण कुंडली कराडकडे" - करुणा शर्मा

"धनंजय मुंडे यांची संपूर्ण कुंडली कराडकडे आहे. त्यांची कुंडली कुणासमोर उघड होऊ नये म्हणून रणजित कासलेला ते कराडचा एन्काउंटर करायला सांगू शकतात." असा आरोप करुणा शर्मा यांनी केला.

Sangli Live : पंढरपूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व दुचाकीमधील अपघातात एकजण जागीच ठार

पंढरपूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील येथे ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. गुराप्पा सिद्धाप्पा म्हेत्रे (वय ५५) असे मृताचे नाव आहे. उभ्या ट्रकवर मागून दुचाकीवरून आलेल्या गुराप्पा मैत्री यांनी जोराची धडक दिली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Yavatmal Live: शासनाच्या परवानगीशिवाय सूतगिरणी कन्व्हेन्शन तत्त्वावर भाडेतत्त्वावर

यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील पिंपळगाव कान्हा येथील बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणी नियमबाह्यपणे शासनाच्या परवानगीशिवाय कन्व्हेन्शन तत्त्वावर भाडेतत्त्वावर दिली. अशी तक्रार पुसद येथील पंजाबराव खडकेकर आणि डॉ मोहम्मद नदीम यांनी वस्त्रोद्योग आयुक्त नागपूर यांच्याकडे केली. या पत्राची दखल घेत वस्त्रोद्योग आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

Buldhana Live: बुलढाण्यात अपघात, चार जणांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यात मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Pune Live : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनमध्ये तज्ज्ञांच्या समितीची बैठक सुरू, कोणत्या बाबी तपासणार?

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनमध्ये तज्ज्ञांच्या समितीची बैठक सुरू झाली आहे. तज्ज्ञांची समिती तिन्ही अहवालाच्या कागदपत्रांची तपासणी करणार आहे. या समितीमध्ये ससूनचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह, स्त्रीरोग विभागप्रमुख, औषधशास्त्र विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख, भूलशास्त्र विभागप्रमुख, बालरोगतज्ज्ञ विभागप्रमुख अशा सहा जणांचा समावेश तनिषा भिसे प्रकरणातील सर्व बाबी तज्ज्ञांकडून तपासले जाणार आहेत. त्यानंतर अंतरिम अहवाल अलंकार पोलिस स्टेशनमध्ये सादर करण्यात येणार आहे.

Pune Live : पूजा खेडकर फसवणूक प्रकरण, २१ एप्रिल रोजी होणार पुढील सुनावणी

पूजा खेडकर विरोधातील सुनावणी पुढे ढकलली

पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार

पूजा यांच्यावर संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC) आणि अपंगत्व कोट्याअंतर्गत आरक्षण मिळविण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप

Live : टिपेश्वर अभयारण्यात पहिल्यांदाच आढळला रानगवा

यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यात पहिल्यांदाच रानगव्याची वैज्ञानिक नोंद करण्यात आली आहे. अलीकडच्या काही वर्षात या अभयारण्यात वाघाची संख्या वाढली आहे. त्यानंतर आता प्रथमच रानगव्याची नोंद करण्यात आली आहे.

१९८५ मध्ये, त्यानंतर २००२ ते २००३ मध्ये रानगवा दिसल्याची चर्चा होती. मात्र, त्याची नोंद झाली नव्हती. दरम्यान आता ११ एप्रिल २०२५ला टिपेश्वर अभयारण्याच्या ११०मध्ये काही पर्यटकांनी रानगवा पाहिल्याचे सांगितले.

Delhi Live : रॉबर्ड वड्राचं घरापासून ईडी कार्यालयापर्यंत पायी वारी Junnar Live : ओझरमधील अस्वच्छतेच्या प्रश्नावर नागरिक आक्रमक

ओझरमधील अस्वच्छतेच्या प्रश्नावर नागरिक आक्रमक चांगलेच आक्रमक झालेत. शहरातील अस्वच्छतेच्या प्रश्नावर नगरपरिषदेला जाग येण्यासाठी ओझरमध्ये वारकऱ्यांकडून ओझर नगरपरिषद कार्यालयावर दिंडी मोर्चा काढण्यात आला. स्मशानभूमीत पाणी नाही, वरचे पत्रे उडालेले, गावात विविध ठिकाणी तुंबलेल्या गटारी, रस्त्यांच्या दुतर्फा घाणीचे साम्राज्य अशा वेगवेगळ्या समस्या नागरिकांनी मांडल्या आणि एकनाथी भारूडातून प्रबोधन देखील करण्यात आलं. या आंदोलनानंतर तरी शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलीय.

Pune Live: सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलबाहेर बस चालकांचं ठिय्या आंदोलन

सिंहगड आरएमडी स्प्रिंगडेल स्कूलबाहेर स्कूल बस चालकांचा ठिय्या. ३७ महिन्यांचा पगार थकवल्याचा आरोप या चालकांनी केलेला आहे. यामुळं पालकही हतबल झाले आहेत.

Nagpur Live : नागपुरात तरुण रेस्टॉरंट मालकाचा गोळ्या झाडून खून

नागपूरच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरामध्ये सोमवारी रात्री झालेल्या गोळीबारात एका रेस्टॉरंट मालकाचा खून करण्यात आला. अविनाश भुसारी वय 28 वर्षे असे मृत रेस्टॉरंट मालक तरुणाचे नाव आहे. मृत अविनाश भुसारी याच धरमपेठ परिसरात 'सोशा' नावाचे रेस्टॉरंट आहे. रात्री दीड वाजताच्या सुमारास अविनाश भुसारी हे बाजूच्या 'निंबस लौंज' चे मालक आणि त्यांचा मित्रासोबत रस्त्यावर बसले असताना दोन दुचाकीवरून चार आरोपी आले. आणि त्यांनी अविनाश भुसारी यांच्यावर बेछूट गोळीबार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अविनाश भुसारी यांना लगेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.

Bihar Elections Live Updates: आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची बैठक होणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची बैठक होणार. ही दोन्ही पक्षांची विधानसभा निवडणुकांसाठी पहिली औपचारिक बैठक आहे, ज्यात जागावाटप आणि अन्य संबंधित मुद्यांवर चर्चा होईल. १७ तारखेला बिहारमध्ये इंडी आघाडीची बैठक होईल.

Nagpur Live : बोगस शिक्षक भरतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

बोगस शिक्षक भरतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

Buldhana Live : बुलढाण्यात बस आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

बुलढाण्यामध्ये बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० ते १५ जण जखमी झाले आहेत.

Pune Live : पुरंदरमध्ये गावठी दारु प्यायल्याने 3 जणांचा मृत्यू

पुरंदर तालुक्यातील राख गावात गावठी दारु प्यायल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दारु विक्री बंद न झाल्यास आणि तसेच कठोर कारवाई न झाल्यास गावातील तरुणांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Nagpur Live : बनावट शिक्षक भरती प्रकरणातील 5 जणांना आज न्यायालयात हजर करणार

नागपूरमध्ये 580 शिक्षकांना पैसे घेऊन नोकरीला लावण्याचा आल्याचा प्रकार उघड झाला होता. या शिक्षकांकडून नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेण्यात आले. या बनावट शिक्षक भरती प्रकरणातील 5 जणांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Pune Live : पुण्याच्या तापमानात वाढ होणार, पारा चाळीशीपार पोहोचणार

पुण्यात पुढील पाच ते सहा दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता, तसेच किमान तापमानही सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उन्हाचा चटका, उष्मा सहन करावा लागणार आहे.

Sangali Live : भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रात्री ११ वाजताच्या सुमारास धारकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून ते घरी जात होते तेव्हा ही घटना घडली

Deenanath Mangeshkar Hospital : गर्भवती मृत्यू प्रकरणात आज ससूनचा अहवाल पुणे पोलिसांना मिळणार

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात दीनानाथ रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहेत. आज मंगळवारी ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळणार आहे. तसेच या प्रकरणात आमदार अमित गोरखे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

Pandharpur-Vijaypur Highway : उमदीजवळ अपघात; एकजण जागीच ठार

उमदी : पंढरपूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील येथे ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. गुराप्पा सिद्धाप्पा म्हेत्रे (वय ५५) असे मृताचे नाव आहे.

Kolhapur Crime : आई-वडील, पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचा विवाह झाला, त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले. सासरचे काम जमत नसल्यामुळे तिने आत्महत्या केली. याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली.

Kolhapur News : आंतरभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अनंतराव आजगावकर यांचे उत्तूरमध्ये निधन

उत्तूर : येथील आंतरभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अनंतराव आजगावकर (वय ९५) यांचे निधन झाले. साने गुरुजींच्या राष्ट्रसेवा दलाच्या विचारधारेतून तयार झालेली आंतरभारती संस्था खेड्यापाड्यातल्या गरीब, सर्वसामान्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी स्थापन केली. साने गुरुजींचा खरा विचार पोहाोचवण्याचे काम करणारी संस्था म्हणून आजही त्या शाळेकडे पाहिले जाते.

Lucknow Hospital Fire : लोकबंधू रुग्णालयाला लागली आग; २४ रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल

लोकबंधू रुग्णालयात आग लागल्यानंतर रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. ट्रॉमा सेंटरचे प्रभारी डॉ. विपिन मिश्रा म्हणाले, "पाच रुग्ण दाखल झाले असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सर्व विभागातील डॉक्टर काम करत आहेत.'

Valmik Karad LIVE : वाल्मीक कराडच्या 'एन्काउंटर'ची होती सुपारी; निलंबित पोलिस अधिकाऱ्याचा दावा

बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा एन्काउंटर करण्याची सुपारी मला मिळाली होती, असा दावा निलंबित व वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याने केला आहे. याबाबतचा व्हिडिओ कासले याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. वाल्मीक कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी आपल्याला पाच, दहा कोटींपासून ५० कोटी रुपयांपर्यंतची सुपारी होती, असा दावाही त्याने केला आहे.

Sanjay Ghatge LIVE : माजी आमदार संजय घाटगेंचा आज भाजप प्रवेश

कोल्हापूर : जनता दल, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष ते पुन्हा शिवसेना ठाकरे गट असा राजकीय प्रवास केलेले कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह त्यांचे पुत्र ‘गोकुळ’चे संचालक अंबरिशसिंह घाटगे हे मंगळवारी (ता. १५) भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत.

Salman Khan LIVE : अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

मुंबई : ‘अभिनेता सलमान खान याची हत्या निश्चित आहे, घरात घुसून त्याला ठार मारू किंवा त्याची मोटार बाॅम्बने उडवून देऊ,’ असा धमकीवजा लघुसंदेश अनोळखी व्यक्तीने रविवारी (ता. १३) पहाटे वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्स ॲप हेल्पलाइनवर पाठवला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.

Mehul Choksi LIVE : फरार हिरेव्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक, भारतीय तपास संस्थांच्या विनंतीवरून कारवाई

Latest Marathi Live Updates 15 April 2025 : अभिनेता सलमान खान याची हत्या निश्चित आहे, घरात घुसून त्याला ठार मारू किंवा त्याची मोटार बाॅम्बने उडवून देऊ,’ असा धमकीवजा लघुसंदेश अनोळखी व्यक्तीने रविवारी (ता. १३) पहाटे वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्स ॲप हेल्पलाइनवर पाठवला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तसेच मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा एन्काउंटर करण्याची सुपारी मला मिळाली होती, असा दावा निलंबित व वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याने केला आहे. फरार हिरेव्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. भारतीय तपास संस्थांनी केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केली. जनता दल, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष ते पुन्हा शिवसेना ठाकरे गट असा राजकीय प्रवास केलेले कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह त्यांचे पुत्र ‘गोकुळ’चे संचालक अंबरिशसिंह घाटगे हे मंगळवारी (ता. १५) भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वारकरी संप्रदाय, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला दिलेला आध्यात्मिकतेचा संदेश जगात जावा यासाठी पंढरपूर ते लंडन अशी विठुरायाची दिंडी काढण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.