रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलुंड, ता. १६ (बातमीदार) ः उन्हाळ्यामध्ये सध्या दिवसेंदिवस तापमान वाढत चालले असून, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. नेमकी हीच बाब ओळखून मुलुंड येथील सुमती या सेवाभावी संस्थेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर रविवारी (ता. १३) मुलुंड पूर्वेतील मराठा मंडळ हॉल येथे पार पडले. सहभागी झालेल्या लोकांना अल्पोहार आणि रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिरात तब्बल १५० नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला आणि एकूण १५० रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या.