पुणे: पुण्यातील चंदनगर परिसरात एका तरूणाच्या डोक्यात फरशी घालून संपवल्याची (Pune Crime News) संतापजनक घटना समोर आली आहे. काल (गुरुवारी) रात्री चंदनगर परिसरात एका तरुणाचा खून (Pune Crime News) करण्यात आला आहे. प्रदीप अडागळे असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे या दोघांनी मिळून त्याचे डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार केले. अडागळे गंभीर अवस्थेत असताना त्याला ससून येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोघेही आरोपींना चंदन नगर पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले आहेत. अडागळे हा सतत ऋषी आणि त्याच्या आईला शिवीगाळ करत असल्याचीही माहिती समोर आली होती. त्याचबरोबर ऋषी काकडेच्या बहिणीसोबत प्रदीप अडागळे याचे प्रेमसंबंध होते, त्याच कारणातून आणि रागातून आईने आणि मुलाने प्रदीप अडागळेचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.(Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभराची खुन्नस आणि राग यातून दोघांनी प्रदीप अडागळेच्या डोक्यात फरशी (Pune Crime News) घालून त्यास संपवलं. पुण्यातील चंदन नगर परिसरातील गुरुवारी रात्री साडे 11 दरम्यानची ही घटना आहे. काल (गुरुवारी) रात्री चंदनगर परिसरात भावाने, आईने बहिणीच्या बॉयफ्रेंडला फरशीच्या तुकड्याने मारहाण करुन हत्या केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप अडागळे हा ऋषी काकडे यांच्या बहिणीचा बॉयफ्रेंड होता. वर्षभरापासून दोघांमध्ये खुन्नस (Pune Crime News) होती. बहिणीला त्रास का देतो म्हणत कायम दोघामध्ये वादावादी व्हायची. काल रात्री साडे अकराच्या सुमारास दोघे चंदननगर परिसरात असलेल्या भाजी मंडीमध्ये ऋषी काकडे त्यांची आई सविता आणि मित्र शुभम मांढरे याने प्रदीपला थेट फरशीने मारहाण केली. यात प्रदीप गंभीर जखमी झाला. रात्रीच प्रदीपला ससूनला उपचारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र या घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
काल(गुरूवारी) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चंदननगर भाजी मार्केट टॉयलेट शेजारी व आदिनाथ स्टिलसमोर चंदननगर भाजी मार्केट, चंदननगर पुणे 14 या ठिकाणी बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरुन प्रप्रदीप अडागळे याला ऋषीकेश काकडे, ऋषीकेश काकडे याची आई व इतरांनी ठार मारण्याचे उद्देशाने फरशीचे तुकड्याने डोक्यावर, तोंडावर मारुन गंभीर जखमी केले, यानंतर त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अधिक पाहा..