- rat७p४.jpg-
२५N६२२५९
रत्नागिरी ः शिरगाव येथे झालेल्या खरीप हंगामपूर्व कार्यशाळेप्रसंगी आयोजित प्रदर्शनातील साहित्य पाहताना शेतकरी.
---
खरीपपूर्व कार्यशाळेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः खरीप हंगामात भात व नाचणी लागवड करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी लागते यावर खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
ही कार्यशाळा शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात झाली. या कार्यशाळेमध्ये डॉ. विजय दळवी यांनी खरीप हंगामपूर्व नियोजनात भात व नाचणी लागवड करताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. पुरस्कारप्राप्त शेतकरी हेमंत फाटक व संदीप कांबळे यांनीही शेतकऱ्यांना माहिती दिली. उपस्थित शेतकऱ्यांना पाणी फाउंडेशनच्या शेतीशाळा उपक्रमाबद्दल झूम बैठकीद्वारे तसेच पाणी फाउंडेशनच्या गट शेतीविषयक पोवाडा दाखवून गटशेतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी रत्नागिरी प्रदीप भुवड यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी पीक संग्रहालयाला भेट दिली. या वेळी आत्माच्या श्रुती पाटील, संकेत पवार आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत निवड झालेले क्षेत्र उत्पादक कंपनीचे सदस्य व शेतकरी, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनअंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनी व गटाचे सभासद, तालुक्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
---