How To Be Calm In War- Like Situation: 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे भयावह दहशतवादी हल्ला झाला. यात 27 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुदलाने आज मध्यरात्री पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करून ऑपरेशन सिंदूर पार पाडले.
याबद्दल लगेच सगळ्या माध्यमांवर बातम्या आणि इतर माहिती प्रसारित होऊ लागली आहे. देशभरात बऱ्याच ठिकाणी अभिमानाचे वातावरण निर्माण झालेले दिसत असले तर अनेक नागरिक मनात युद्धाची भीती बाळगून बसले आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या हिंसक घटनेनंतर सैन्याने कडक पावले उचलली आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये युद्धासारखी परिस्थिती असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेलेल्या घटनेने सम्पवूर्न देशाला हादरवून टाकले आहे. त्यानंतर भारतीय लष्कराने उचललेलं पाऊल जरी निर्णायक ठरत असलं, तरी अनेक सामान्य लोकांच्या मनात अजूनही असुरक्षिततेची भावना आहे. खास करून तरुण पिढी आणि शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसत आहे.
आज ७ मे रोजी देशभरात नागरी संरक्षण मोहिमेचा (Civil Defence Drill) भाग म्हणून नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी युद्धजन्य परिस्थितीत काय करावे याचे प्रात्यक्षिक दिले जात आहे. ही तयारी जरी आवश्यक असली तरी अनेक नागरिकांना यातून युद्धाची शक्यता अधिक जाणवत असून त्यामुळे मानसिक अस्थिरता वाढली आहे.
तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या घटना लोकांमध्ये भीती आणि अनिश्चितता निर्माण करतात. काय होणार हे कळत नाही, सतत काहीतरी वाईट होईल अशी भावना मनात राहते. त्यामुळे चिंता वाढते, झोप नीट लागत नाही आणि मन उदास राहतं. विशेषतः ज्यांना आधीपासून मानसिक आरोग्याच्या तक्रारी आहेत, त्यांच्यावर याचा अधिक परिणाम होतो.
संभाव्य समस्याचिंता
युद्ध होणार की नाही हे मनात भीती निर्माण करते. हल्ला होईल का, आपले लोक सुरक्षित असतील का, अशा विचारांनी मन बेचैन होते. वारंवार या विषयावर विचार करणे, बातम्या पाहत राहणे यामुळे मानसिक थकवा आणि येऊ शकतो.
अनिश्चिततेचा परिणाम
भविष्यात काय होईल हे समजत नाही, हीच अनिश्चितता अनेक मानसिक त्रासांना कारणीभूत ठरते. जे लोक आधीपासून ताणतणाव अनुभवत असतात, त्यांच्यात या काळात ही लक्षणे अधिक वाढण्याची शक्यता असते.
मानसिक ताण अन् चिंता दूर करून मन शांत ठेवण्यासाठी काय करावे?बातम्यांपासून काही काळ दूर राहा
सतत सोशल मीडियावर अस्वस्थ करणाऱ्या बातम्या पाहिल्याने मानसिक तणाव वाढतो. त्यामुळे जाणीवपूर्वक ब्रेक घेणे गरजेचे आहे.
ध्यान, प्राणायाम करा
रोज काही वेळ स्वतःसाठी काढा. श्वसनाचे व्यायाम, योग, किंवा ध्यान यामुळे तणाव कमी होतो.
प्रियजनांशी संवाद साधा
आपल्या भावना कुटुंबीयांशी, मित्रमैत्रिणींशी शेअर करा. बोलून व्यक्त होणे खूप महत्त्वाचे असते.
तज्ज्ञांची मदत घ्या
जर स्वतःहून ही स्थिती हाताळणे शक्य नसेल, तर मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्या.
स्वतःच्या कृतीवर लक्ष केंद्रित करा
भविष्यात काय होईल हे आपल्या हातात नसले तरी, आपण काय करू शकतो यावर लक्ष देणे आवश्यक आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.