सर्वात कमी वयात डेब्लू, पहिल्या चेंडूवर षटकार… 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याच्या नावावर अनेक विक्रम
GH News April 20, 2025 11:08 AM

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये राजस्थान आणि लखनौ यांच्यात रोमांचक सामना शनिवारी झाला. या सामन्यात लखनौ संघाने शेवटच्या षटकात राजस्थानचा २ धावांनी पराभव केला. परंतु या सामन्यापेक्षा सर्वात कमी वयाचा खेळाडू वैभव सूर्यवंशी याची जास्त चर्चा झाली. वैभव सूर्यवंशी याने केवळ १४ वर्षे आणि २३ दिवसांच्या असताना आयपीएलमध्ये पदार्पण केले. सर्वात कमी वयाचा आयपीएल खेळाडूचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

रे बर्मन याचा विक्रम वैभव याने मोडला. बर्मन याने १६ वर्षे १५७ दिवसांच्या वयात आरसीबीमधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तसेच मुजीब उर रहमान याने २०१८ मध्ये पंजाबकडून पदार्पण केले. त्यावेळी त्याचे वय १७ वर्षे ११ दिवस होते. वैभव सूर्यवंशी फक्त सर्वात तरुण खेळाडू नाही तर त्याने बॅटनेही आपला प्रभाव दाखवला. वैभव याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात षटकार मारून केली. हे केल्यानंतर तो एका खास क्लबमध्ये सामील झाला आहे. वैभव याने पदार्पणात तडाखेदार खेळी करत ३४ धावा केल्या. त्यासाठी त्याने फक्त २० चेंडू घेतले. त्याने यशस्वी सोबत ८५ धावांची सलामी भागीदारी केली.

आयपीएलमध्ये यापूर्वी कोणी-कोणी लावले पदार्पणात षटकार

  • रोब क्विनी (RR)
  • केवोन कूपर (RR)
  • आंद्रे रसेल (KKR)
  • कार्लोस ब्रॅथवेट (DD)
  • अनिकेत चौधरी (RCB)
  • सिद्धेश लाड (MI)
  • महेश तीक्ष्णा (CSK)
  • समीर रिजवी (CSK)
  • वैभव सूर्यवंशी (RR)

वैभव सूर्यवंशीच्या नावावर विक्रम

आयपीएलमध्ये करारबद्ध झालेला सर्वात युवा खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशी याचे नाव समाविष्ट आहे. त्याला राजस्थानने एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेत संघात सामील केले. तसेच १९ वर्षांखालील कसोटी सामन्यात सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. वैभव याने ५८ चेंडूत शतक झळकावले होते. १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये त्याने १७६ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. वैभव सूर्यवंशी याने स्थानिक क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.