Maharashtra Live Updates: राज ठाकरे – उद्धव ठाकरेंच्या टाळी प्रतिटाळीने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडाली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर स्वागतच, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तर एकत्र आले तर कोणाचं पोट दुखतंय…असं अजित पवार म्हणाले. तसेच केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, त्यातच महाराष्ट्राचं हित, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी सुवर्णक्षण असल्याचं देखील रोहित पवारांनी सांगितले. तर पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालय़ाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. घैसास दोषी असल्याचा ससून हॉस्पिटलचा अहवाल देण्यात आला आहे. वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.