मुघल बादशहाच्या हरममध्ये हजारो महिला असायच्या. बादशहाला खूश करणं, एवढंच त्यांचं काम होतं.
बादशहाच्या बेडपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक कनीज उतावळी असायची. परंतु तसं व्हायचं नाही.
अबूल फजलने लिहिलंय की, अकबराच्या हरममध्ये पाच हजारांपेक्षा जास्त महिला होत्या. परंतु यातल्या काही शेकडा महिलाच बादशहापर्यंत पोहोचू शकल्या.
बादशहाच्या बेगम आणि हरममधल्या हजारो महिलांपैकी कोणीही एक महिला बादशहासोबत झोपेल, हे ठरण्याचा अधिकार असायचा.
दारु पिण्यासाठी बादशहा हरममध्ये जायचे. नाच-गाणं आणि संगीताची धून सुरु असायची. यातच पिणं-पाजणं चालायचं.
जोपर्यंत बादशहा बेडवर जाण्याची इच्छा व्यक्त करत नाही, तोपर्यंत अय्याशी सुरु असायची. आजूबाजूला सुंदर आणि उमद्या तरुणी असायच्या.
डच व्यापारी फ्रान्सिस्को हा जहांगिरच्या काळात भारतात आलेला होता. त्याने मुघल बादशहांच्या अय्याशीबद्दल लिहिलंय.
तो लिहितो, बादशहा जेव्हा हरममध्ये असायचा तेव्हा तो ठरवायचा की, आज कोणाला सोबत न्यायचं. मग ती बेगम असो वा कनिज.. किंवा दुसरं कुणी.
बादशहाच्या इच्छेशिवाय कुणालाही यामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नसायचा. अर्थात यावरुन महाराण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकारण चालायचं.
हरममध्ये हजारो महिला असायच्या, परंतु हरमच्या बाहेर कुणालाही जाता यायचं नाही. जर कुणी तसा प्रयत्न केलाच तर तिला मृत्यूदंड दिला जायचा.
शिवाय हरममध्ये जाण्याचा अधिकार केवळ बादशहाला असायचा. कुणीही पुरुष आतमध्ये जात नसे. महिलांच्या देखभालीसाठी किन्नर नेमलेले असत.