Q4 Results Calendar : १०० हून अधिक कंपन्यांचे तिमाही निकाल या आठवड्यात येणार, पहा संपूर्ण यादी
मुंबई : कंपन्यांकडून मार्च तिमाहीचे निकाल सादर केले जात आहेत. टीसीएसने सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत इन्फोसिस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक सारख्या मोठ्या कंपन्यांनी त्यांचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. यासोबतच अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणाही केली आहे. आता या आठवड्यात १०० हून अधिक कंपन्या जानेवारी-मार्च तिमाहीचे निकाल सादर करणार आहेत. कंपन्यांचे निकाल केवळ कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणार नाहीत तर शेअर बाजाराची दिशा देखील ठरवू शकतात. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये यापैकी कोणत्याही कंपनीचे शेअर्स असतील, तर या आठवड्यात कोणत्या कंपनीचे निकाल कोणत्या तारखेला जाहीर होणार आहेत ते जाणून घेणे आवश्यक आहे.
२१ एप्रिल, सोमवारआज अनंत राज, आदित्य बिर्ला मनी, आलोक इंडस्ट्रीज, जीएनए एक्सल्स, हिमाद्री स्पेशालिटी केमिकल, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, लोटस चॉकलेट कंपनी, महिंद्रा लॉजिस्टिक्स, इंद्रप्रस्थ गॅस, इंडॅग रबर, पिट्टी इंजिनिअरिंग, पर्पल फायनान्स, राजरतन ग्लोबल वायर, शेखावती पॉली-यार्न, शिल्चर टेक्नॉलॉजीज आणि सीएल फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपन्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
२२ एप्रिल, मंगळवारएयू स्मॉल फायनान्स बँक, केंब्रिज टेक्नॉलॉजी, सेला स्पेस, चॉइस इंटरनॅशनल, सिस्ट्रो टेलिमॅटिक्स, सायंट डीएलएम, जेएमजे फिनटेक, महिंद्रा फायनान्स, संपन्न इन्फोटेक, टाटा कम्युनिकेशन्स, डेल्टा कॉर्प, हॅथवे केबल, हॅवेल्स इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीज, हुथमाकी इंडिया, व्हीएसएल अॅग्रोटेक, वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज मंगळवारी त्यांचे तिमाही निकाल जाहीर करतील.
२३ एप्रिल, बुधवार३६० वन डब्ल्यूएएम, एएनएस इंडस्ट्रीज, अॅस्टेक लाईफसायन्सेस, बजाज हाऊसिंग फायनान्स, कॅन फिन होम्स, डालमिया भारत, डेन नेटवर्क्स, इमको एलिकॉन, महिंद्रा स्कूटर्स, मंगलोर केमिकल्स, रॅलिस इंडिया, रेफेक्स इंडस्ट्रीज, सुप्रीम पेट्रोकेम, फिलेटेक्स इंडिया, ग्रॅव्हिटी इंडिया, गुजरात हॉटेल्स, आयआयआरएम होल्डिंग्ज, इंडसइंड बँक, आयटीआय, खेतान केमिकल्स, एलटीआयमाइंडट्री, सिंजीन इंटरनॅशनल, टाटा कंझ्युमर, थायरोकेअर, टिप्स इंडस्ट्रीज, तमिळनाड मर्केंटाइल बँक, टाटा टेली (महाराष्ट्र), वेंड्ट इंडिया.
२४ एप्रिल, गुरुवारआवस फायनान्सियर्स, एक्सेडेर, एक्सेलिया सोल्युशन्स, आर्ट्सन इंजिनिअरिंग, अॅक्सिस बँक, सायंट, एलिकॉन इंजिनिअरिंग, एमेसर बायोटेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडियन एनर्जी एक्सचेंज, जयस्वाल नेको इंडस्ट्रीज, किर्लोस्कर न्यूमॅटिक, लॉरस लॅब्स, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, एमफेसिस, नेल्को, नेस्ले इंडिया, न्यू मार्केट अॅडव्हान्स्ड ट्रेडिंग टेक्नॉलॉजीज, पर्सिस्टंट सिस्टम्स, प्राइम सिक्युरिटीज, एसबीआय कार्ड्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, शांती गियर्स, सुमेरू इंडस्ट्रीज, सुप्रीम इंडस्ट्रीज, स्वेलेक्ट एनर्जी, तानला प्लॅटफॉर्म्स, टेक महिंद्रा.
२५ एप्रिल, शुक्रवारऑरम प्रॉपटेक, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट, डीसीबी बँक, जयंत अॅग्रो, केसोराम इंडस्ट्रीज, एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज, मारुती सुझुकी, महिंद्रा हॉलिडेज, आरबीएल बँक, श्रीराम फायनान्स, ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज, पूनावाला फिनकॉर्प, टाटा टेक्नॉलॉजीज, व्हीएसटी इंडस्ट्रीज, झेंसर टेक्नॉलॉजीज.
२६ एप्रिल, शनिवारबीईईएमएल लँड अॅसेट्स, आयडीएफसी फर्स्ट बँक, द इंडिया सिमेंट्स, मनोरमा इंडस्ट्रीज, मंगलोर रिफायनरी, एसबीएफसी फायनान्स, यू ग्रो कॅपिटल या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.