The coming together of Raj and Uddhav Thackeray is a public sentiment
Marathi April 22, 2025 02:25 AM


महाराष्ट्रातील मराठी जनतेने बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावे असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे. विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत, या बातमीने देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. एकत्र येण्यासाठी इच्छा हवी, असे राज ठाकरे म्हणतात ते खरे आहे, पण कोणाच्या इच्छेविषयी ते बोलत आहेत? राज ठाकरे यांनी त्यांची इच्छा व्यक्त करताच उद्धव ठाकरेही मागे राहिले नाहीत आणि महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी त्यांनीही दमदारपणे एक पाऊल पुढे टाकले. काही किरकोळ वाद असलाच तर तो बाजूला ठेवून मीसुद्धा महाराष्ट्र हितासाठी एकत्र काम करायला तयार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. ही महाराष्ट्राच्या लोकभावनेची फुंकलेली तुतारी आहे, असे स्पष्ट मत ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. (Thackeray brothers: The coming together of Raj and Uddhav Thackeray is a public sentiment)

राज ठाकरे यांना एकजुटीचे महत्त्व पटले आणि उद्धव ठाकरे यांनीही मनमोकळेपणाने प्रतिसाद दिला. महाराष्ट्रद्रोह्यांची दाणादाण उडवणारी ही राजकीय घडामोड आहे. दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा येऊन ते चिडचिडपणा करू लागले, तर काही जण चेहऱ्यावर खोटा आनंद आणून ‘‘व्वा, छान! दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आनंदच’’ असे सांगत आहेत, पण महाराष्ट्रद्रोह्यांचा हा आनंद खरा नाही, अशी टीकाही या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हेही वाचा – Thackeray and Thackeray : भाजपा, एसंशिंकडून राज यांच्या खांद्याचा वापर, उद्धव ठाकरेंचा आरोप

भाजपाचे राजकारण हे ‘वापरा आणि फेका’ या वृत्तीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशाचे नाहीत, तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचेच काम त्यांनी केले. महाराष्ट्रात कृष्णा-कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा आणि त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावे, ही त्यांची भूमिका नाही. प्रयागराजच्या गढूळ, अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवले आणि धर्माचा धंदा केला, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

महाराष्ट्रातील मराठी जनतेने बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावे असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे. विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडावे. वाद, भांडणे यात उभे आयुष्य गेले तर महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत, असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – Thackeray brothers : …तर काहींना शेतावर आणि काहींना संघ दक्ष शाखेत जावे लागेल, संजय राऊत खोचक टिप्पणी



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.