सरपंच आरक्षणासाठी शिरूरला उद्या सोडत
esakal April 21, 2025 09:45 PM

शिरूर, ता. २० : शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग आणि महिला या प्रवर्गातील आरक्षण बुधवारी (ता. २३) काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी व महिला या प्रवर्गातील आरक्षण सोडतीद्वारे निश्चीत केले जाणार आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात बुधवारी दुपारी १२ वाजता याबाबतची प्रक्रिया होणार असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.