पोस्ट ऑफिस योजना: लग्नानंतर, भविष्यात मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा उचलायचा हा सगळ्यात मोठा ताण अनेकांना भेडसावतो. आजच्या काळात शिक्षण खूप महाग झालं आहे. त्यात मुलांचे कपडे, शाळेतील साहित्य, त्याचबरोबर शाळेनं आयोजित केलेले विविध प्रकारचे कार्यक्रम या सगळ्या गोष्टींना मोठा खर्च येतो. यासाठी तुम्ही जर सुरुवातीपासूनच योग्य आर्थिक नियोजन केलं तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये (Post Office Scheme) गुंतवणूक करून तुम्ही हे सर्व खर्च भागवू शकता.
आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला 15 वर्षांसाठी निश्चित रक्कम गुंतवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला चांगली रक्कम मिळेल. ही रक्कम तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरु शकता. पोस्ट ऑफिसचे हे छोटे बजेट मॅच्युरिटीनंतर तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रोविडेंट फंड योजना (पीपीएफ योजना) लहान आणि मोठ्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट योजना आहे. या योजनेत तुम्ही वार्षिक किमान 500 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा आहे, म्हणजेच 15 वर्षानंतर तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. या PPF योजनेवर 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते.
जर तुम्ही दररोज 70 रुपये जमा केले आणि पीपीएफ खात्यात दरमहा 2100 रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी चांगली रक्कम मिळू शकते. जर तुम्ही दररोज पीपीएफमध्ये पैसे जमा केले तर तुम्हाला एका वर्षात 25,500 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही 15 वर्षे अशीच गुंतवणूक करत राहिल्यास, 15 वर्षांत तुम्ही 3.75 लाख रुपये जमा कराल आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला 7.1 टक्के व्याजासह एकूण 6,78,035 लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणावरील खर्चाच्या तणावातून मुक्त होऊ शकता. 15 वर्षांनंतर, जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असेल, तेव्हा तुमच्याकडे चांगली रक्कम असेल. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने ही खूप चांगली योजना आहे. भविष्यात मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढतो. त्यामुळं तुम्ही जर पीपीएफ योजनेत गुंतवणूक केली तर हा खर्च भागवताना तुम्हाला कोणताही अडचण येणार नाही.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..