Shocking : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील अभिनेत्याने आयुष्य संपवलं; घरात आढळला मृतदेह, इंडस्ट्रीत खळबळ
Saam TV April 23, 2025 12:45 AM

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या प्रसिद्ध मालिकेतील एका अभिनेत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ललित मनचंदा असे मृत्यू झालेल्या अभिनेत्याचे नाव आहे. त्याने अनेक शो आणि बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. ललित मनचंदा याच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे.

ललित मनचंदाच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. सिन्टाने इन्स्टाग्राम स्टोरीवर ललित मनचंदाला श्रद्धांजली वाहिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेता ललित मनचंदाने मेरठमधील राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. ललित मागील काही महिन्यांपासून मानसिक ताण आणि वैयक्तिक आयुष्याला कंटाळला होता. आर्थिक विवंचनेतून ललित मनचंदा मुंबई सोडून मेरठला शिफ्ट झाला होता.

ललित गेल्या ६ महिन्यांपासून कुटुंबासोबत राहत होता. ललितला इतर कलाकार देखील श्रद्धांजली वाहत आहेत. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' आणि डी डी नॅशनलवरील 'सेवनांचल की प्रेमकथा' शोमध्येही ललिल दिसला होता. पोलिसांनी पंख्या लटकलेल्या अवस्थेत पाहिलं आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. अभिनेत्याचा मृतदेह पोस्टमार्टमनंतर कुटुंबाला सोपवण्यात येणार आहे. अभिनेत्याच्या अंत्यविधीविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्याच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.

ललित मनचंदाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेता ललितच्या पश्चात कुटुंबात पत्नी तरु, १८ वर्षीय मुलगा उज्जवल आणि मुलगी श्रेया असा परिवार आहे. कुटुबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित रविवारी रात्री झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. त्यानंतर सोमवारी सकाळी चहा पिण्यासाठी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठवला. दरवाजा उघडल्यानंतर ललितचा मृतदेह लटकलेला अवस्थेत आढळला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.