सध्या दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. पण ते एकत्र आल्यावर काय होईल ते पाहायला आवडेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी केलं आहे.
UPSC results News : UPSC चा निकाल जाहीर! पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरायुनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSC परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.22) जाहीर झाला. आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार शक्ती दुबे हिचा देशात प्रथम क्रमांक तर पुण्याचा अर्चित डोंगरे याचा देशात तिसरा क्रमांक आला आहे.
Uddhav Thackeray And Ashish Shelar : मुंबईतील जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह उद्धव ठाकरे; भाजप मंत्री शेलार यांची टीकामुंबई शहरातील सर्व जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह उद्धव ठाकरे असून त्यांच्या डोक्यात सतत लँड आणि लँड स्कॅम, असे विचार सुरु असतात. उद्धव ठाकरे यांनी काही नवीन बोलणे सोडून दिले आहे. ते सतत ही जमीन अदानीला दिली, ती जमीन अंबानीला दिली, असेच बोलत असतात, अशी टीका भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केले.
Yugendra Pawar : आम्ही कुटुंब म्हणून आजही एकत्रच आहोत : युगेंद्र पवारआम्ही पवार कुटुंब म्हणून आजही एकत्रच आहोत. आमचं कुटुंब वेगळे झाले आहे, असे मला वाटत नाही. राजकारणात विचार बदलू शकतात. परिस्थिती काही तरी करायला भाग पाडते. कुटुंब म्हणून तुम्ही तोडू शकत नाही. कारण ते रक्ताचं नातं असते, असे विधान युगेंद्र पवार यांनी केले आहे.
Hindi : हिंदी भाषा सक्तीच्या वादात महंत सुधीरदास यांची उडीहिंदी भाषा शालेय शिक्षणात अनिवार्य करण्यासाठी सरकारी आदेश निघाल्यानंतर त्यावरुन वाद-प्रतिवाद सुरु आहे. हिंदी भाषिकांनी त्याचे स्वागत केले असले तरी मनसेने या निर्णयाला मात्र कडाडून विरोध केला आहे. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असं म्हणत राज ठाकरेंनी ही सक्ती खपवून घेणार नाही, असे म्हटले आहे. या वादात आता नाशिकच्या महंतानी उडी घेतली आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास यांनी शालेय शिक्षणात संस्कृत भाषा अनिवार्य करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
BJP News : भाजप आमदाराकडून मंत्री अतुल सावेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रारभाजपचे आमदार भीमराव केराम यांनी मंत्री अतुल सावे यांची तांडा वस्ती निधीच्या मंजुरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. खोट्या वस्त्या आणि लोकसंख्या दाखवून एक कोटी ८५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचा अतुल सावेंवर आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केराम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Sangram Thopte : काँग्रेस पक्षात निष्ठेचे फळ मिळाले नाही : संग्राम थोपटेलोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जोमाने काम केले. महाविकास आघाडीचा धर्म पाळला. पण काँग्रेस पक्षात ज्या निष्ठेने काम केले, त्याचे काहीच फळ माझ्या पदरात पडलं नाही, ही माझी खंत आहे. अनेक वर्षे मी आणि माझ्या वडिलांनी संघर्ष केला. तळागाळात काँग्रेस रुजविण्याचे काम केले आहे. पण आम्हाला आज भाजपत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, असे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
Sangram Thopte : संग्राम थोपटेंच्या भाजपप्रवेशाला बावनकुळेंसह तीन मंत्री, अनेक आमदार उपस्थितभोरचे माजी आमदार तथा काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले संग्राम थोपटे यांनी आज मुंबई भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माजी आमदार थोपटे यांचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल आदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
Sanskrit Language : मराठी शाळामध्ये संस्कृत भाषा सक्तीची करा:महंत सुधीर पुजारीशाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला विरोध असतानाच राज्यातील मराठी शाळांत संस्कृत भाषा सक्तीची करा, अशी मागणी येथील नाशिकमधील श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संस्कृत ही राष्ट्रभाषा करावी, असे महंत सुधीर पुजारी यांचे म्हणणे आहे.
Baramati live: विद्या प्रतिष्ठानची बैठक सुरु; शरद पवार,सुनेत्रा पवार,युगेंद्र पवार उपस्थितबारामतीतील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेची बैठक आज आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार उपस्थित आहेत. यावेळी युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवार यांचे आशीर्वाद घेतले.
State Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठकराज्य मंत्रिमंडळाची दुपारी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शाळांमध्ये हिंदीची सक्ती व राज्यातील पाणीटंचाई या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेणार का, याबाबत उत्सुकता आहे.
PM Narendra Modi : PM मोदी आज सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरपंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करणार आहेत.
Beed Crime Walmik Karad: वाल्मिक कराड जेलमध्ये तरीही बीडमध्ये कार्यकर्त्यांची दहशतसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांनी धक्कादायक दावा केला आहे. कराड सध्या जेलमध्ये असला तरीही त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत कायम असल्याचं गोल्डे यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे. तसंच वाल्मिक कराड हा गुंड आहे हे माहिती असताना देखील बीड पोलिसांनी त्याच्या संरक्षणासाठी दोन कर्मचारी दिल्याचं गोल्डे यांनी सांगितलं आहे.
Rajendra Ghanwat wife Death : राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? दमानियांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाणखूप खूप धक्कादायक ! राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत, व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावणकुळे यांच्या कडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे घनवट यांच्या पत्नी मनाली यांचा मृत्यूवर संशय उपस्थित केला जात आहे.
"आम्ही मागे एक रुपयांत पीकविमा देण्यास सुरुवात केली होती. मात्र, ती योजना अडचणीत आली. खूप लोकांनी आम्हाला चुना लावला. आम्ही आता तुमच्या भल्याचं असेल, ते करणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नव्याने ही योजना आणली जाईल. यासाठी जुन्या योजनेत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काही बदल केले जातील", असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
Buldhana : शेगावमधील नखं आणि केस गळणाऱ्या गावात केंद्र सरकारचं पथक दाखलबुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात केस गळती नंतर त्याच रुग्णांना आता नख गळती सुरू झाली आहे. या गंभीर प्रकाराची आता केंद्र सरकारने दखल घेतली आहे. यासाठी रुग्णांचा अभ्यास करण्यासाठी तात्काळ एक पथक नेमले असून हे पथक आज संबंधित गावांचा दौरा करणार आहे.
Zeeshan Siddiqui death threat : झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकीराष्ट्रवादीचे नेते दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल द्वारे त्यांना धमकी देण्यात आली आहे. झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची मागील वर्षी हत्या करण्यात आली होती. त्यांना देखील हत्येआधी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता झिशान यांना धमकी आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताची पोलिसांचे पथक झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहे.