काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी धक्कादायक आणि वेदनादायी आहे. ह्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या प्रियजनांप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर आराम पडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अश्या भ्याड हल्ल्यांचा केवळ निषेध केला जाणार नाही तर चोख प्रत्युत्तर देऊन आपल्या सीमांचं आणि नागरिकांचं रक्षण केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
कठोर कारवाई करा - राज ठाकरेमनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी.... हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये... आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल.
Pahalgam Terrorist Attack : दहशतवाद्यांच्या भ्याड हल्लायत आतापर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यूजम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशासह जगभरात एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा समावेश आहे.
Pahalgam Terrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मोदी भारतात दाखलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून ते तातडीने भारतात परतले आहेत. जम्मु काश्मिरधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ते तातडीने भारतात आले आहेत. कालच्या हल्ल्यानंतर PM मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. यानंतर अमित शाह हे श्रीनगरला गेले असून ते आज ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या घटनास्थळाला भेट देणार आहेत.