जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आतापर्यंत या हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचे प्राण गेले असून, अनेकजण गंभीर जखमी आहेत. ही संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी 'द रेजिस्टन्स फ्रंट' (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. TRF चे मुख्यालय पाकिस्तानमध्ये असून, लष्कर-ए-तोयबाचा हा प्रॉक्सी गट मानला जातो.
सज्जाद गुल – TRF चा मास्टरमाइंडTRF चा सूत्रधार सज्जाद गुल सध्या पाकिस्तानातून कार्यरत आहे. त्याला दहशतवादी हाफिज सईदचा उजवा हात मानले जाते. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी त्याच्यावर अनेक वर्षांपासून मोठा इनाम जाहीर केले असून, त्याचा शोध सातत्याने घेतला जात आहे. सज्जाद गुल हा TRF च्या सर्व ऑपरेशन्सचा मुख्य नियोजक मानला जातो.
TRF कसा झाला सक्रिय?हटवल्यानंतर TRF ही संघटना ऑनलाइन प्रचार माध्यमांद्वारे सक्रिय झाली. सुरुवातीला केवळ लष्करच्या कारवायांना समर्थन देणाऱ्या गटाप्रमाणे काम करणारा हा संघ आता थेट हल्ल्यांमध्ये सहभागी होतो. पाकिस्तानच्या लष्कर व ISI कडून TRF ला फंडिंग मिळते.
हे नाव "द रेजिस्टन्स फ्रंट" असे इंग्रजीत ठेवण्यात आले, जेणेकरून भारत TRF चा थेट संबंध पाकिस्तानशी जोडू शकणार नाही. पण प्रत्यक्षात TRF ही पूर्णपणे पाकिस्तानप्रणीत संघटना असून, काश्मीरमधील लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम करते.
टार्गेट किलिंगची खास शैलीTRF ची कार्यशैली ही लक्षवेधी आहे. हे गट विशेषतः टार्गेट किलिंगवर लक्ष केंद्रित करतो. अल्पसंख्याक काश्मिरी पंडित, गैर-कश्मीरी नागरिक आणि राजकीय कार्यकर्ते हे त्यांचे प्रमुख लक्ष्य असतात. 2020 मध्ये कुलगाममध्ये TRF च्या नावाचा पहिल्यांदा उघड उल्लेख झाला होता, जेथे भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला होता.
TRF च्या घातक कारवायांची आकडेवारी2022 मधील एका सरकारी अहवालानुसार, काश्मीरमध्ये 90 पेक्षा अधिक अतिरेकी ऑपरेशन्स TRF च्या सहभागाने पार पडले. 172 अतिरेकी ठार झाले, यातील 108 TRF चे सदस्य होते. याच वर्षी TRF ने सर्वाधिक भरती केली होती. यावरून त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार स्पष्टपणे दिसतो.
पहलगाम हल्ल्यात धार्मिक विद्वेषपहलगाम हल्ल्याच्या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अतिरेक्यांनी आधी नागरिकांचा धर्म विचारला आणि मग गोळीबार केला. हा प्रकार 90 च्या दशकातील काळोख्या आठवणी जागृत करणारा आहे. हा हल्ला पुन्हा एकदा दाखवतो की TRF चा उद्देश फक्त दहशत पसरवण्याचा नसून, धार्मिक तेढ वाढवण्याचा आहे.
सज्जाद गुल-सज्जाद गुल कधीही थेट कारवायांमध्ये दिसून येत नाही. तो पाकिस्तानातून सुरक्षित आश्रयस्थानी राहून TRF च्या अतिरेक्यांना सूचना देतो. अशा प्रकारे तो स्वतःला धोका न पत्करता दहशतीच्या मोहिमा रचतो. त्याची जागा निश्चित करण्यासाठी भारतीय गुप्तचर संस्था अनेक प्रयत्न करत आहेत.
TRF चा खात्मा आवश्यकTRF सारख्या संघटनांचा उद्देश काश्मीरमध्ये अशांतता पसरवणे आहे. अशा संघटनांवर कठोर कारवाई करणे आणि त्यांच्या प्रमुखांपर्यंत पोहोचणे हे भारतासाठी अत्यंत गरजेचे आहे. सज्जाद गुलसारखे मास्टरमाईंड अजूनही पाकिस्तानमध्ये सुरक्षित आहेत.