SRH vs MI : रोहित शर्माचा सलग दुसऱ्या अर्धशतकासह कारनामा, 9 वर्षानंतर असं केलं
GH News April 24, 2025 03:05 AM

मुंबई इंडियन्सची आयपीएल 2025 मधील सुरुवात निराशाजनक राहिली. मुंबईला पहिल्या 5 पैकी 4 सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र त्यानंतर मुंबई लोकल ट्रॅकवर आली सुसाट सुटली. मुंबईला आता रोखणं अशक्य झालंय. मुंबईने बुधवारी 23 मार्चला राजीव गांधी स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. मुंबईचा हा या मोसामतील सनरायजर्स हैदराबादविरुद्धचा सलग दुसरा विजय ठरला. तसेच मुंबईचा हा सलग चौथा तर एकूण पाचवा विजय ठरला. मुंबईला विजय मिळवून देण्यात हिटमॅन रोहित शर्मा याने निर्णायक भूमिका बजावली. रोहितने हैदराबाद विरुद्ध अर्धशतकी खेळी. रोहितने यासह 9 वर्षानंतर पुन्हा एकदा असा कारनामा केला.

एकट्या रोहित शर्माने 50 टक्के धावा केल्या. हैदराबादने मुंबईसमोर विजयासाठी 144 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 15.4 ओव्हरमध्ये फक्त 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. रोहितने या विजयी खेळीत सर्वाधिक योगदान दिलं. रोहितने 46 बॉलमध्ये 152.17 च्या स्ट्राईक रेटने 70 रन्स केल्या. रोहितने या खेळीत 3 षटकार आणि 8 चौकार लगावले.

रोहितचं 9 वर्षांनंतर सलग दुसरं अर्धशतक

रोहितने त्याआधी 11 व्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने 35 चेंडूत 142.86 च्या स्ट्राईक रेटने 3 सिक्स षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने हे अर्धशतक पूर्ण केलं. रोहितचं हे या मोसमातील एकूण सलग दुसरं अर्धशतक ठरलं. रोहितने यासह 2016 नंतर अर्थात 9 वर्षांनी हा कारनामा केला. रोहितने तब्बल 9 वर्षानंतर सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. रोहितने हैदराबाद विरुद्धच्या सामन्याआधी वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 45 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 76 रन्स केल्या. होत्या.

रोहितचं सलग दुसरं अर्धशतक

रोहितच्या IPL 2025 मधील धावा

दरम्यान रोहित शर्मा याने आयपीएल 2025 मध्ये 8 सामने खेळले आहेत. रोहितने या 8 सामन्यांमध्ये 154.05 च्या स्ट्राईक रेटने आणि 32.57 सरासरीने 148 चेंडूच्या मदतीने एकूण 228 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान एकूण 18 चौकार आणि 15 षटकार लगावले आहेत.

मुंबईचा पुढील सामना केव्हा?

दरम्यान मुंबई इंडियन्स या मोसामतील आपला पुढील सामना हा 27 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार आहे. मुंबई आणि लखनौ दोन्ही संघ या मोसमात 4 एप्रिलनंतर पुन्हा आमनेसामेन असतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.