vs Mumbai Indians Marathi Update: मुंबई इंडियन्सची सुरुवात खास झाली नसली तरी रोहित शर्माच्या फटकेबाजीने त्यांना विजयाचे स्वप्न दाखवले आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आजच्या सामन्यात रोहितने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. त्याचवेळी एक विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या नावावरही विक्रमाची नोंद झाली आहे.
सनरायझर्स हैदराबादने ५ बाद ३५ धावांवरून विरुद्ध ८ बाद १४३ धावा उभ्या केल्या. ट्रॅव्हिस हेड ( 0), अभिषेक शर्मा ( ८), इशान किशन ( १) व नितीश कुमार रेड्डी ( २) हे स्वस्तात माघारी परतले. अनिकेत वर्मा १२ धावांवर बाद होताच हैदराबादची अवस्था ५ बाद ३४ अशी झाली. पण, हेनरिच क्लासेन व इम्पॅक्ट प्लेअर अभिनव मनोहर यांनी सहाव्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या. क्लासेनने ४४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ७१ धावांची खेळी केली. मनोहरनेही ३७ चेंडूंत ४३ धावा केल्या.
मुंबई इंडियन्ससाठी ट्रेंट बोल्टने २६ धावांत ४ विकेट्स घेतल्या, दीपक चहरने सुरुवातीलाच दोन विकेट्स घेऊन हैदराबादला बॅकफूटवर फेकले होते. जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. जसप्रीतने आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३०० विकेट्सचा पल्ला गाठला. सर्वात कमी सामन्यांत ३०० विकेट्स घेणाऱ्या जलदगती गोलंदाजांमध्ये जस्सीने तिसरे स्थान पटकावले, तर एकूण तो पाचव्या क्रमांकावर आहे.
जस्सीने २३७ सामन्यांत ३०० विकेट्स पूर्ण करताना मुस्ताफिजूर रहमान ( २४३) व इम्रान ताहिर ( २४७) यांचा विक्रम मोडला. या यादित वनिंदू हसरंगा ( २०८), अँड्य्रू टाय ( २११), राशीद खान ( २१३) व लसिथ मलिंगा (२२२) हे जस्सीच्या पुढे आहेत. दरम्यान, त्याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक १७० विकेट्स घेणाऱ्या मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी केली.
रायन रिकेल्टन ( ११) दुसऱ्या चेंडूवर जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर बाद झाला. हैदराबादच्या गोलंदाजाने अप्रतिम रिटर्न कॅच घेत आयपीएलमधील १०० विकेट्सचा टप्पा गाठला. पण, रोहितने त्याच्याच षटकात तुफान फटकेबाजी केली. त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा टप्पा ओलांडला. यासाठी त्याने ४४३ इनिंग्स खेळल्या आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक ( ४५१) व किरॉन पोलार्ड ( ५५०) यांना त्याने मागे टाकले. या विक्रमात ख्रिस गेल ( ३४३), विराट कोहली ( ३६०), डेव्हिड वॉर्नर ( ३६८), जॉस बटलर ( ४०५) व अॅलेक्स हेल्स ( ४३२) हे रोहितच्या पुढे आहेत.