एके-47 च्या मेड इन चायना स्टील बुलेट्सचा वापर : तालिबानकडून शस्त्रांची खरेदी
सर्कल संस्था/ श्रीनगर
एनआयएच्या प्रारंभिक तपासात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मिळू लागले आहेत. बैसरनमध्ये तपासादरम्यान सुरक्षा यंत्रणांना हल्ल्यात वापरण्यात आलेल्या 50-70 काडतूसं मिळाली असून ती अमेरिकेत निर्मित एम4 कार्बाइन असॉल्ट रायफल आणि एके-47 द्वारे चालविण्यात आली होती. एके-47 च्या गोळ्या चीनमध्ये निर्मित होत्या. एम4 कार्बाइन देखील पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या तालिबानकडुन प्राप्त केली आहेत. हल्ल्यात दोन विदेशी दहशतवाद्यांसमवेत 4 दहशतवादी होते, हे सर्व जण भारतीय सैन्याच्या गणवेशात आले होते. याचबरोबर दोन स्थानिक हस्तकांनी बैसरम येथील मैदानात उपस्थित राहत दहशतवाद्यांना सहाय्य केल्याचे तपासात आढळून आले आहे.
पहलगामनजीक पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन समोर आले आहे. प्रारंभिक तपासानुसार दोन दहशतवाद्यांकडे एम4 कार्बाइन असॉल्ट रायफल्स होत्या, तर अन्य दोन दहशतवाद्यांकडे एके-47 रायफल्स होत्या. दहशतवाद्यांनी तेथे 20-25 मिनिटांपर्यंत पर्यटकांचा धर्म जाणून घेत विशिष्ट धर्माच्या लोकांना वेचून वेचून ठार केले आहे.
एम4 कार्बाइन असॉल्ट रायफल्स अमेरिकेतच निर्माण होतात. ऑगस्ट 2021 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातू सैन्य माघार घेतली होती, परंतु स्वत:च्या शस्त्रास्त्रांचा साठा तेथेच सोडून दिला होता. तालिबानने अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांवर कब्जा केला आणि आता ही शस्त्रास्त्रs दहशतवादी गटांना विकली जात आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आयएसआयच्या मदतीने एम4 कार्बाइन खरेदी केल्याचे मानले जात आहे.
चीनकडून स्टील बुलेट्सची निर्मिती
घटनास्थळी सुरक्षा यंत्रणांना एके-47मध्ये वापरण्यात येणाऱ्या गोळ्या मिळाल्या असून त्या मेड इन चायना आहेत. चीनमध्ये निर्मित गोळ्या बुलेटप्रूफ जॅकेटला छेदून शरीरात घुसू शकतात. हे स्टील बुलेट नावाने प्रसिद्ध आहे. पाकिस्तान सध्या चीनकडून शस्त्रास्त्रs आणि गोळ्या खरेदी करणारा सर्वात मोठा खरेदीदार आहे. चीनमध्ये निर्मित गोळ्या दहशतवाद्यांना पाकिस्ताननेच पुरविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर दहशतवादी हल्ल्यासाठी पहलगाममध्ये पूर्ण तयारीनिशी आले होते, शस्त्रास्त्रांसोबत त्यांच्या बॅगेत ड्रायप्रूट्स देखील होती. पाकिस्तानी सैन्याकडून त्यांना प्रशिक्षण दिले गेले असावे असे मानले जात आहे.
स्थानिकांची दहशतवाद्यांना मदत
तपास यंत्रणांच्या सूत्रांनुसार दहशतवाद्यांना काही स्थानिक लोकांनी देखील मदत केली होती. दहशतवादी किश्तवाडमधून आले आणि स्वत:च्या स्थानिक हस्तकांच्या मदतीने कोकेरनागमार्गे बैसरन येथे पोहोचले. हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांचे स्थानिक सहाय्यक देखील हजर होते. गुप्तचर यंत्रणांनी काही दिवसांपूर्वी एक दहशतवादी समूह हल्ल्याची योजना आखत असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वी जारी केला होता. आयईडी हल्ला होऊ शकतो अशी भीती त्या इशाऱ्यात व्यक्त करण्यात आली होती. परंतु गोळीबाराच्या घटनेचा गुप्तचर यंत्रणांना पूर्वीच सुगावा लागू शकला नव्हता. तपास यंत्रणा आता या दहशतवाद्यांना स्थानिक स्तरावर कुणी मदत केली याचा शोध घेत आहेत. पोलीस आसपासच्या भागांमध्ये शोधमोहीम राबवत असून अनेक संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.