रोजच्या धावपळीच्या कामात आपण खूप थकतो, त्यामुळे अनेकदा आपण दिवसभरात थकल्यावर व झोप आल्यावर जांभई देतो. त्यात थकल्यामुळे जांभई येणे खुप सामान्य आहे. अशातच तुम्हाला दिवसभर वारंवार जांभई येत असेल. त्यात अनेकजण हा थकवा दुर करण्यासाठी दुपारपर्यंत अनेक कप कॉफी पित असाल आणि तुम्ही हा तुमच्या दिनचर्येचा भाग बनवला तर हा सामान्य थकवा नसून गंभीर आरोग्याच्या समस्येचे लक्षण असू शकते. त्यामुळे काही वैज्ञानिक अहवालानूसार, वारंवार जांभई येणे हे झोपेच्या कमतरतेचे आणि झोपेच्या विकाराचे लक्षण असू शकते.
दिवसा जास्त झोप येणे ही केवळ आळस येत असेल तर त्यामुळे ड्रायव्हिंग अपघात, कामाच्या चुका, मानसिक समस्या आणि दीर्घकालीन आजार देखील होऊ शकतात. ही स्थिती बहुतेकदा अशा लोकांमध्ये दिसून येते ज्यांना पुरेशी आणि चांगली झोप मिळत नाही. त्यामुळे झोपेचा अभाव ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे, ज्यामुळे समाजात दररोज अपघात आणि आरोग्य समस्या वाढत आहेत.
डॉक्टरांच्या मते, वारंवार जांभई येणे हे केवळ थकव्याचे लक्षण नाही तर शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नसल्याचा हा इशारा आहे. याकडे तुम्ही जर दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठा आजार होऊ शकतो. म्हणून आजारांपासून दूर राहण्यासाठी झोपेला प्राधान्य द्या आणि निरोगी जीवनासाठी जागरूक रहा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)