भारतानं मुसक्या आवळताच पाकिस्तानचा थयथयाट; घेतला मोठा निर्णय
GH News April 24, 2025 07:08 PM

मोठी बातमी समोर येत आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्यानंतर आता पाकिस्ताननं देखील मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमावावा लागाला. यामध्ये दोन विदेशी नागरिकांचा देखील समावेश होता. तर या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले. दरम्यान या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत, या निर्णयामुळे पाकिस्तानचा चांगलाच थयथयाट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर बंदी घातली आहे, तसेच पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच सिंधु पाणी वाटप कराराला देखील स्थगिती देण्यात आली आहे. याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.