Vijay Wadettiwar criticizes Naresh Mhaske after his controversial statement regarding air travel for tourists from Maharashtra
Marathi April 24, 2025 11:26 PM


पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. नरेश म्हस्के यांच्या विधानावर आता विरोधक टीका करताना दिसत आहेत.

मुंबई : जम्मू आणि काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण तिथे अडकले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना विशेष विमानाने टप्याटप्प्याने राज्यात आणले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी (23 एप्रिल) जम्मू-काश्मीर दौऱ्यावर होते. त्यांच्याकडून आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. नरेश म्हस्के यांच्या विधानावर आता विरोधक टीका करताना दिसत आहेत. (Vijay Wadettiwar criticizes Naresh Mhaske after his controversial statement regarding air travel for tourists from Maharashtra)

विजय वडेट्टीवार यांनी नरेश म्हस्के यांच्या विधानाचा व्हिडीओ ट्वीट करताना म्हटले की, महायुती सरकारमधील नेत्यांमध्ये श्रेयवादाची आणि स्वत:च्या मार्केटिंगची स्पर्धा किती असावी? जे कधी विमानात बसले नाहीत, त्यांना पण एकनाथ शिंदे यांनी विमान प्रवास घडवून आणला. ही वेळ काय? कोणी कधी कसले श्रेय घ्यायचे, याचेही भान राहिले नाही का? पर्यटकांना सुखरूप आणणे महत्त्वाचे की विमान प्रवास? आणि ते केलं म्हणून श्रेय घ्यायचा? असा प्रश्नांचा भडीमार वडेट्टीवार यांनी केला.

हेही वाचा – Sanjay Gaikwad : आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी…; संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने राजकारण तापणार

विजय वडेट्टीवार म्हणाले की, पहलगाममध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झाला असून काही जखमी झाले आहेत, तर काही अडकले आहेत. त्यांना धीर देण्यापेक्षा सगळ्यात आधी तिथे कोण पोहचत आहे, याची स्पर्धा सुरू आहे. गरज नसताना उपमुख्यमंत्री यांनी काश्मीर वारी केली. इथवर न थांबता तुम्ही कसे गेले, कशी मदत केली याचे गोडवे गाण्यासाठी शिंदे सेनेचे खासदार पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांवर किती उपकार केले अशी भाषा करतात? महायुती सरकारमधील मंत्री आणि खासदार अशा सगळ्यांनी जबाबदारीचे भान सोडले आहे का? किमान अशा घटनांमध्ये तरी स्वत:चे मार्केटिंग करणे सोडा,” असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते नरेश म्हस्के?

एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्यानंतर विरोधकांनी टीका केली होती. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नरेश म्हस्के म्हणाले की, एकनाथ शिंदे तिथे गेल्याने अधिकार्‍यांना प्रोत्साहन मिळाले असून त्यांची काम करण्याची स्फूर्ती वाढली आहे. परंतु एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता. 45 लोक रेल्वेने पहलगामला गेले होते आणि ते तिथे अडकले. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लोकांना एका सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहायला लागले. तिथे त्यांच्या खाण्याचे देखील वांदे होते. परंतु त्या लोकांना एकनाथ शिंदेंनी विमानतळावर आणले आणि ती लोकं आता पहिल्यांदा विमानात बसत आहेत. पहलगामला रेल्वेनी गेलेली ती लोकं आहेत. त्यांना पहिल्यांदा विमानात बसवून महाराष्ट्रात आणले जात आहे, असे वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केले होते.

हेही वाचा – Pahalgam Attack : दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिम संघटना आक्रमक; आम्हाला बॉर्डरवर जाऊ द्या, जय श्रीरामचे नारे देऊन…



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.