पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बुधवारी पाकिस्तान विरोधात पहिलं मोठं पाऊल उचललं. गुरुवारी पाकिस्तानवर याचा परिणाम दिसून आला. खासकरुन कराची पूर्णपणे ढेपाळलं. पेहेलगाम हल्ल्ल्यानंतर भारताने पाच प्रमुख निर्णय घेतलेत. यात सिंधू जल करार संपवणं, वाघा बॉर्डर बंद करणं, सार्क व्हिसा सवलत बंद करणं हे निर्णय घेतले आहेत. या निर्णयानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्नुसार पाकिस्तानी शेअर बाजार आज सकाळी उघडल्यानंतर पाच मिनिटात 2500 अंकांनी कोसळला. पाकिस्तानी शेअर बाजाराची काय स्थिती आहे? जाणून घेऊया.
क्षेत्रीय अस्थिरता आणि भारताकडून बदल्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानी गुंतवणूकदार धोका पत्करण्याच्या मानसिकतेत नाहीयत. इंडेक्स ओपन झाल्यानंतर पाच मिनिटात सेन्सेक्स 2,565 अंकांनी कोसळला. कराची स्टॉक एक्सचेंज 1260 अंक म्हणजे एक टक्क्यापेक्षा जास्त कोसळलाय. तिथे 1,15,960 अंकांवर व्यवहार सुरु आहे.
पाकिस्तानात कुठल्या शेअर्समध्ये घसरण
कमर्शियल बँकांमध्ये 699.02 अंक, तेल आणि गॅस कंपन्यांमध्ये 312.76 अंक, सीमेंट 240 अंक, इंवेस्टमेंट बँक / इंवेस्टमेंट कंपन्या / सिक्योरिटीज कंपन्यांच्या शेअर्समध्ये 215.98 अंक आणि खाद्य कंपन्यांच्या शेअर्समध्ये 215.57 अंकांची घसरण दिसून आली. सर्वात जास्त नुकसान बीडब्ल्यूसीएल कंपनीच झालं. 10 टक्के घसरण झाली. दुसऱ्याबाजूला एजीएल शेअर्समध्ये 8.40 टक्के घसरण झाली. ईएफयूजीमध्ये 8.38 टक्के आणि जीएडीटीमध्ये 5.91 टक्के आणि पीओएमएलच्या शेअर्समध्ये 5.38 टक्के घसरण दिसून आली.
भारतीय शेअर बाजारातही थोडी घसरण
भारतीय शेअर बाजारात सुद्धा थोडी घसरण झाली. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 247.30 अंकांच्या घरसरणीसह 79,869.55 अंकांवर व्यवहार करतोय. दुसऱ्यबाजूला नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टी जवळपास 68 अंकांच्या घसरणीसह 24,261.20 अंकांवर व्यवहार करतोय. शेअर बाजारात सलग 7 दिवस तेजी पहायला मिळाली. सेंसेक्स आणि निफ्टीला 8 टक्क्यांचा फायदा झाला होता.