आयपीएल 2025 स्पर्धेतील निम्म्यापेक्षा अधिक सामने खेळवण्यात आले आहेत. आता प्लेऑफसाठी 10 संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. काही संघांची स्थिती फार चांगली आहे. तर काही संघांवर या मोसमातून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. मुंबई इंडियन्सने बुधवारी 24 एप्रिलला सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने मात केली. मुंबईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली. मुंबईचा हा या मोसमातील सलग चौथा आणि एकूण पाचवा विजय ठरला. मुंबई अशाप्रकारे पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावरुन तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाली. मात्र मुंबईने या सामन्यात हैदराबाद विरुद्ध फसवणूक केली, असा आरोप केला जात आहे.
मुंबईने राजीव गांधी स्टेडियममध्ये हैदराबाद विरुद्ध फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. क्रिकेट नियमानुसार सामन्यात एका संघाकडून 11 खेळाडू खेळतात. मात्र मुंबई या सामन्यात 12 खेळाडूंसह खेळली, असा आरोप पलटणवर केला जात आहे. हा आरोप खरा आहे का? असं काय म्हटलं जात आहे? हे जाणून घेऊयात.
मुंबईने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादच्या बॅटिंगदरम्यान ईशान किशन याला आऊट नसतानाही आऊट दिलं. ईशान किशन याला अशा पद्धतीने आऊट देण्यावरुन आता वादाला तोंड फुटलं आहे. मुंबईच्या कोणत्याच खेळाडून अपील केली नाही. मात्र त्यानंतरही अंपायरने इशान किशन याला कॅच आऊट असल्याचा निर्णय दिला. मात्र स्निको मीटरमध्ये पाहिल्यानंतर समजलं की बॉल इशानच्या बॅटला लागलाच नाही. त्यामुळे तो वाईड बॉल होता.
तसेच नियमानुसार जोवर फिल्डिंग करणारी टीम अपील करत नाही तोवर अंपायरला निर्णय देता येत नाही. मात्र त्यानंतरही अंपायरने कोणत्याही अपीलशिवाय निर्णय दिला. त्यामुळे अंपायरवर फिक्सिंगचा आरोप केला जात आहे. तसेच मुंबईने अंपायरला विकत घेतलंय, असंही म्हटलं जात आहे.
पाहा व्हायरल व्हीडिओ
अंपायरने दिलेल्या या अशा निर्णयामुळे मुंबई या सामन्यात 11 नाही तर 12 खेळाडूंसह खेळत होती, असं म्हटलं जात आहे. तो 12 वा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून अंपायर असल्याचं म्हटलं जात आहे.