मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारतर्फे गिरीश महाजन यांना पाठवलं असेल तर काश्मीरला दुसरं कोणी जायची तिथे गरज नाही. यावरून तुम्ही महाराष्ट्राच्या सरकारमधील वाद दाखवत आहात. आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतोय, विरोधी पक्ष आणि सरकार एक असल्याचं सांगतोय. पण काश्मीरच्या या दु:खद प्रसंगी महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष श्रेयवादाच्या लढाईत महाराष्ट्राचं हसं करत आहेत, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काश्मीर दौऱ्यावर टीका केली आहे.
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणारपहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. हेच पहिले विमान 83 प्रवाशांना घेऊन श्रीनगरहून मुंबईत आज येणार आहे.
भारताच्या हल्ल्याची पाकिस्तानला भीतीपहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताना विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला भारत हल्ला करेल, अशी भीती वाटते आहे. त्यामुळे भारतीय नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात उतरल्याने पाकिस्तानकडून समुद्रात आज युद्ध सराव करण्यात येतो आहे.
डोंबिवली, मालेगावमध्ये आज बंदकश्मीरमध्ये झालेल्या पर्यटकांच्या हत्येच्या निषेधार्थ आज (गुरुवार) डोंबिवली, मालेगावमध्ये बंद पाळण्यात येत आहे. या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.
शरद पवारांनी घेतली जगदाळे कुटुंबीयांची भेटपहलगामहल्ल्यात मृत्यू झालेले पुण्याती संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी भेट घेतली. शरद पवार यांच्याकडून संतोष जगदाळे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
एकनाथ शिंदेंनी कश्मीरमध्ये पर्यटकांना दिला धीरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री कश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. शिंदे यांनी कश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांची भेट घेतली तसेच त्यांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. सरकार पर्यटकांच्या मागे ठामपणे उभे असल्याचेही ते म्हणाले.
Pahalgam attack All Party meeting : पहलगाम हल्ला, आज सर्वपक्षीय बैठककेंद्र सरकारने कश्मीर खोऱ्यात झालेल्या पहलगाम आंतकवादी हल्ल्यावर आज (गुरुवार) सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. हल्ल्याविषयी रणनीती तसेच सुरक्षा उपाय योजनांबाबत यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तर,