छत्रपती सहकारी साखर कारखान्यातच्या संचालक पदासाठी तब्बल 478 उमेदवाराचे अर्ज झाले वैध झाले असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला बारामतीत सुरुवात झाली आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे पृथ्वीराज जाचक यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची 18 मे रोजी निवडणूक होत आहे,यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
श्रीरामपूर, अहिल्यानगर आणि धुळे येथील सहा तृतीयपंथी जम्मू काश्मीरमध्ये अडकलेपर्यटनासाठी गेलेले श्रीरामपूर, अहिल्यानगर आणि धुळे येथील सहा तृतीयपंथी श्रीनगरमध्ये अडकले आहेत.. पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाल्यानंतर तिकडे भितीचे वातावरण असून विमानाचे तिकीट मिळणे मुश्किल झाल्याचं त्यांनी सोशल माध्यमावर व्हिडिओ प्रसारित करून सांगितलं आहे.. महाराष्ट्र सरकारने आम्हाला येथून लवकरात लवकर बाहेर काढावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.. अडकलेल्यांमध्ये अहिल्यानगर येथील तृतीयपंथीयांचे काजल गुरु आणि धुळे येथील पार्वती गुरू यांचा समावेश आहे...
अकोले तालुक्यातील राजूर गावात कावीळ आजाराचे थैमान_100 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरूअकोले तालुक्यातील राजुर गावात कावीळच्या साथीने जोर धरला असून गेल्या काही दिवसातच 100 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.. अनेकांना संगमनेर, राजूर आणि अकोले येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे.. या साथीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत..
शिवसेनेकडून अतिरेकी हल्ल्याच्या निषेध; मुकमोर्चा काढत सामूहिक श्रद्धांजली .....नंदुरबार येथें जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेकडून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Dombivli: काश्मीरमधील बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षांनी पुकारला डोंबिवली बंदडोंबिवली बंदला हॉटेल व्यवसायिकांचा पाठिंबा
डोंबिवलीतील सर्व हॉटेल्स आज दुपार पर्यंत बंद राहणार
- अजित शेट्टी, हॉटेल व्यावसायिक, डोंबिवली
जम्मू काश्मीर येथील झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी कडकडीत बंदजम्मू काश्मीर येथील झालेल्या पर्यटकावर आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे हा बंद व्यापारी व नागरिकाकडून कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात सर्व तालुक्यात बंद पाळण्यात आला आहे दिवसभर बंद पाळल्यानंतर सायंकाळी परभणी शहरातून पाच वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा शहरातील शनिवार बाजार येथून निघत मुख्य बाजारपेठ मधून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी.
Dombivli: काश्मीरमधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत ठाकरे गट रस्त्यावर उतरलेकाश्मीरमधील पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ठाकरे गट रस्त्यावर उतरला
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून डोंबिवलीत दुकानदारांना बंद करण्याचा आव्हान
ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी स्टेशन परिसरात दाखल झालेत डोंबिवलीकर दुकानदारांना दुकान बंद ठेवण्याचा आवाहन केलं
Flight Ticket Price: अमरावती-मुंबई विमान सेवेचे तिकीट दर गगनाला..30 एप्रिल पर्यंतचे बुकिंग तिकीट 8 हजारावर..
2 मे पासून 3 हजार 864 रुपये दर दिसतो आहे.
16 जून नंतर 2625 रुपये आणि 25 जून नंतर 2100 रुपये दर्शवितो आहे.
सर्व सामान्य नागरिकांना विमान प्रवासाचा दर न परवडणारा आहे..
याशिवाय विमानाची वेळ देखील सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीची नाही.. त्यामुळे वेळ बदलण्याची देखील मागणी होते आहे..
Kokan News: तवसाळ ते जयगड खाडी पूल 700 कोटींचाकोकणातील मुंबई - गोवा महामार्गाला पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सागरी महामार्ग उभारणीसाठी वेगाने पावले उचलली जात आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील 8 खाडीपुलांपैकी 6 खाडीपुलांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तवसाळ ते जयगड जोडणारा खाडी पूल 700 कोटींचा आहे. बाणकोट आणि दाभोळ खाडीपुलाच्या निविदा 7 जूनला उघडण्यात येणारा आहे.
Amravati News: पहलगाम येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या अमरावती बंदची हाक..अमरावतीत एक दिवसाय पाळला जाणार बंद..
अमरावतीत तीव्र निषेध आंदोलन..
उद्या सकाळी 10 वाजता राजकमल चौकात श्रद्धांजली वाहून तीव्र केला जाणार निषेध..
विश्व हिंदू परिषद आणि हिंदू संघटनेचे आयोजन..
राज्याचे मुख्य सचिव आज घेणार आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा- त्र्यंबकेश्वरच्या आराखड्याला अंतिम रूप देण्याची तयारी
- २९ एप्रिलला चौंडीमध्ये होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर शहराच्या आराखड्याचा सादरीकरण
- प्रशासनानं सादर केलेल्या १५ हजार कोटींच्या आराखड्यात सातत्याने बदल
- त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यातील ८३७ कोटींची काम सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी तर उर्वरित कामं कुंभमेळ्यानंतर हाती घेण्याचं नियोजन
त्र्यंबकेश्वर साधू हत्याप्रकरणी दोन जणांना 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी- अजय गमे आणि वाळू कसबे अशी संशयित आरोपींची नावे
- दोन्हीही सदाशिव घोटे या साधूचे शेजारी
- त्र्यंबकेश्वर साधू मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना नाशिक न्यायालयात करण्यात आले हजर
- साधूला लाथा बुक्क्यांनी झाली होती मारहाण, मारहाणीसह साधू जमीनीवर कोसळल्याची घटना झाली होती सीसीटीव्हीत कैद
- नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई
Maharashtra News Live Updates: करमाळ्यात 2 लाख 60 हजार रूपयांचा गांजा जप्तकरमाळा पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान 2 लाख 60 रूपये किंमतीचा दहा किलो गांजा पकडला आहे. ही कारवाई करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा येथे करण्यात आली.या प्रकरणी पुणे येथील गौरव माल्हिकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिर्डीत मुस्लिम बांधवांनी जाळला पाकिस्तानचा ध्वजशिर्डीमध्ये मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय.. भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांनी काढलेल्या मशाल मोर्चात सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.. यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हिंदु - मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून रोष व्यक्त केला आणि दहशतवादाविरोधात भारत देश एकजुटीने उभा असल्याचा संदेश दिला..
रांजणगावच्या MEPL कंपनीच्या दुरंगधीयुक्त सांडपाण्यावरुन कोल्हे संतापलेरांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीकडून कोणतीही प्रक्रिया न करता थेट सांडपाणी बाहेर टाकले जात असल्याने शेतजमीन नापीक झाल्याने खासदार अमोल कोल्हे चांगलेच संतापलेत
धाराशिव शहराला पाणी पुरवठा करणारी एक योजना सहा वर्षापासून बंदधाराशिव शहराला पाणी पुरवठा करणारी एक योजना सहा वर्षापासून बंद आहे तर दुसऱ्या योजनेचा एक पंप नादुरुस्त आहे त्यामुळे दररोज आठ एमएलडी पाण्याची तुट निर्माण होत आहे.त्यामुळे धाराशिव शहराला चार दिवसाआड पाणी मिळत आहे.या दोन्ही योजना नव्याने करण्यासाठी मंजुरी मिळाली असली तरीही ती पुर्णत्वाकडे जाईपर्यंत धाराशिव करांना चार दिवसाआड मिळणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागणार आहे. शहराला सध्या उजणी व तेर येथील तेरणा प्रकल्पातुन पाणीपुरवठा केला जात आहे.
रावेरमध्ये पहलगाम घटनेचा निषेध ' अतिरेक्याच्या पुतळ्याचे केले दहनरावेर, जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी पर्यटनाला आलेल्या नागरिकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालून हत्या केल्याच्या निषेधार्थ येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरात मुख्य चौकात अतिरेक्याचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय आणि विदेशी पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
जगदाळेंच्या पार्थिवाचे दर्शन घ्यायला शरद पवार दाखलराष्ट्रवादीचे नेते शरद पवार जगदाळे यांच्या घरी दाखल होणार आहेत अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिली.
संतोष जगदाळे यांच्यावर त्यांची मुलगी आसावरी जगदाळे ही अंत्यविधी करणार आहे.
शरद पवार अंत्य दर्शनाला आले आहेत
अंत्यदर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी
9 वाजता अंत्य यात्रा निघणार
DHULE धुळ्यातील दोन तृतीयपंथी जम्मू कश्मीरमध्ये अडकलेधुळ्यातील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर तथा उपाध्यक्ष पार्वती जोगीसह पाच जण पहिलगाम पासून 50 किलोमीटरवर आपल्या काही कामासाठी गेल्या असता त्या ठिकाणी अडकले आहेत, पार्वती जोगी ,साक्षी जोगी, काजल गुरु (अहिल्यानगर) पिंकी गुरु अहिल्यानगर हे अडकलेल्या तृतीयपंथी पर्यटकांची नावे आहेत, कालपासून कुठल्याही प्रकारची व्यवस्था होत नसल्याने तृतीयपंथीय दहशतीखाली आहेत.
भाजप आमदाराला नशेत शिव्या देणं भोवलं?, पोलीस निरीक्षक 'तूनकलवार' यांचं निलंबन..अकोल्यातल्या मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर शिव्या दिल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर निलबंनाची कारवाई करण्यात आली.. गुरांच्या तस्करीवरून भाजप आमदार पिपंळे यांनी थेट बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तूनकलवार यांना फोन केला. मात्र, याच वेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला अन थेट पोलिस अधिकारी आमदाराला फोनवर शिव्या देऊन बसला. असा आरोप करीत भाजप आमदाराने शिव्या देणाऱ्या ठाणेदारावर निलंबन करा.. अन्यथा राजकीय आमदाराची इज्जत राहणार नाही, असे गृहमंत्र्यांना ऑडिओ क्लिपद्वारे मागणी केली होती. त्यानंतर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी तूनकलवार यांच्यावर पोलीस विशेष महानिरीक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी देखील सुरु आहे..
बुलढाणा जिल्ह्यातील 54 पर्यटक श्रीनगर व जम्मूमध्ये अडकलेजम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील ५४ पर्यटक सध्या श्रीनगर आणि जम्मूजवळ अडकले असून, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली आहे. यातील पाच जण आज हवाई मार्गे परतणार असून, उर्वरित ४९ जण जम्मूमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.
या पर्यटकांमध्ये बुलढाणा शहरातील ५, शेगावमधील ३, नांदुरा आणि खामगाव येथील प्रत्येकी १७, तसेच जळगाव (खान्देश) येथील ४ व्यक्तींचा समावेश आहे. या ४९ जणांचा ग्रुप १८ एप्रिल रोजी मलकापूर रेल्वेस्थानकावरून जम्मूकडे रवाना झाला होता. १९ एप्रिल रोजी ते जम्मूला पोहोचले, मात्र ढगफुटीमुळे पुढचा प्रवास रोखण्यात आला. त्यानंतर कटरा मार्गे हे पर्यटक श्रीनगरला पोहोचले. पहलगाम हल्ल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी फक्त एक रात्र श्रीनगर येथे काढली आणि लगेचच परतीचा प्रवास सुरु केला आहे... अद्याप पर्यंत हे पर्यटक जिल्ह्यात पोहोचले नाहीत...
पहलगाम येथे झालेला भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोरेगाव येथे प्रांताधिकार्यांना निवेदनकाश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त होत असताना साताऱ्यातील कोरेगांव विधानसभा मतदारसंघ वतीने जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी या भ्याड हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहण्यात आली.डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
बीड येथील तरुणीने धाराशिव मध्ये केलेले आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी बदललामयत मुलीच्या आईने पोलिसांच्या तपासावर उपस्थित केलं होतं प्रश्नचिन्ह
मयत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाचा तपास अधिकारी बदलण्यात आला
आत्महत्या प्रकरणात अगोदरच सखोल तपास झाला आहे, मात्र मयत मुलीच्या आईने उपस्थित केलेल्या प्रश्नावर पुन्हा तपास होणार - पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची माहिती
बीड येथे शिक्षण घेत असलेल्या मुलींने धाराशिव येथे मामाच्या घरी केली होती आत्महत्या
आत्महत्या प्रकरणात मुलीला आरोपी अभिषेक कदम कडून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याचा मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप , पोलिसांकडून नीट तपास झाला नसल्याचाही आक्षेप
मयत मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून केली होती तक्रार
पोलिसांनी आरोपी अभिषेक कदमला अटक करत न्यायालयात हजर केल्यानंतर जामीन मिळालेला
नर्सरी ते सातवीची शाळा सकाळच्या सत्रात घ्या;जिल्हाधिकारीयवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात उन्हाचा पारा वाढला आहे. या उष्णतेचा चिमुकल्या विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी नर्सरी ते सातवीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी निर्गमित केले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.