शहा विद्यालयात पर्यटकांना श्रद्धांजली
किन्हवली, ता.२४ (बातमीदार)ः काश्मीर येथील पहेलगाममध्ये अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांना किन्हवली येथील शहा चंदुलाल सरूपचंद विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळ वेखंडे, उपमुख्याध्यापक आर.जे.सावंत, पर्यवेक्षिका अरुणा जाधव, सांस्कृतिक प्रमुख अर्चना देसले, ज्येष्ठ शिक्षक एस.के.उबाळे, एस. डी. धोदडे, पी. टी.सासे, बी.जे.सनांसे शिक्षक-शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी पाकिस्तानच्या कट कारस्थानाचा निषेध केला.