Pahalgam : पहलगाम प्रकरणानंतर पाकिस्तानला आणखी एक झटका, PSL च्या प्रसारणावर बंदी
GH News April 24, 2025 07:08 PM

पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली. या दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर द्या, त्याना ठेचून काढा, अशी मागणी साऱ्या देशवासियांकडून केली जात आहे. पहलगाम घटनेनंतर देशभरात पाकिस्तानविरुद्ध असलेल्या रोषात आणखी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने या घटनेनंतर पाकिस्तानची कोंडी करणारे बरेच निर्णय घेतले आहेत. त्यानंतर आता खेळासंदर्भात एक मोठा निर्णय घेत पाकिस्तानला दणका दिला आहे. सध्या पाकिस्तानमध्ये पीएसएल अर्थात पाकिस्तान लीग सुपर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र पहलगाम घटनेनंतर भारतात पीएसएलचे सामने न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात पीएसएलचं प्रसारण करणाऱ्या कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आणि पीएसला मोठा झटका लागला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.