बजाज समूहातील कंपनीचा डबल धमाका, भागधारकांना देणार 60 रुपयांचा लाभांश, रेकॉर्ड तारीखही जाहीर
मुंबई : बजाज समूहातील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीने गुंतवणूकदारांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश आणि विशेष लाभांश दोन्ही जाहीर केले आहेत कंपनी आपल्या भागधारकांना प्रति शेअर ३० रुपये अंतिम लाभांश (३००%) आणि प्रति शेअर ३० रुपये विशेष लाभांश (३००%) देणार आहे. अशा प्रकारे एका शेअरवर एकूण ६० रुपये लाभांश मिळेल.
रेकॉर्ड तारीख निश्चित महाराष्ट्र स्कूटर्सच्या संचालक मंडळाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे, जो आता कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीसाठी ठेवला जाईल. हे लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान झाल्यानंतरच दिले जातील. कंपनीने असेही सांगितले की लाभांशाची रेकॉर्ड तारीख २७ जून २०२५ निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की ज्या गुंतवणूकदारांकडे या तारखेला कंपनीचे शेअर्स आहेत त्यांनाच या लाभांशाचा लाभ घेता येईल. कंपनीने म्हटले आहे की पात्र गुंतवणूकदारांना लाभांश २७ किंवा २८ जुलै २०२५ रोजी दिला जाईल.
लाभांश इतिहासमहाराष्ट्र स्कूटर्स ही बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (BHIL) ची उपकंपनी आहे. ही कंपनी उत्पादन आणि गुंतवणूक क्षेत्रात काम करते आणि बीएसई ५०० निर्देशांकाचा देखील एक भाग आहे. कंपनीने याआधीही त्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा लाभांश दिला आहे. कंपनीने २०२४ मध्ये दोन हप्त्यांमध्ये प्रति शेअर एकूण १७० रुपये लाभांश दिला होता. २०२३ मध्येही कंपनीने १७० रुपये लाभांश दिला होता. तर २०२२ मध्ये हा आकडा १८० रुपये होता.
निव्वळ नफाजानेवारी-मार्च २०२५ या तिमाहीत महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडचा निव्वळ नफा ५१.६३ कोटी रुपये होता. एक वर्षापूर्वी हा आकडा फक्त १० लाख रुपये होता. ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल ६.६५ कोटी रुपये होता, जो मार्च २०२४ च्या तिमाहीत ५.१८ कोटी रुपयांवरून वाढला आहे. एकूण खर्च गेल्या वर्षीच्या ५ कोटी रुपयांवरून २.३८ कोटी रुपयांवर घसरला.
शेअर्समध्ये तेजीमहाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडचा शेअर्समध्ये २३ एप्रिल रोजी बीएसईवर १९७ रुपयांनी वाढून ११,६३२रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप १३३०० कोटी रुपये आहे. गेल्या ३ महिन्यांत या शेअरमध्ये २४ टक्के वाढ झाली आहे. फक्त २ आठवड्यात त्यात १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२५ अखेर प्रवर्तकांकडे कंपनीत ५१ टक्के हिस्सा होता.