Cricket : पहलगाम हल्ल्यानंतर हा खेळाडू पाकिस्तानला पोहचला, IPL 2025 मधून केलीय कमाई
GH News April 24, 2025 09:08 PM

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला.  या घटनेनंतर साऱ्या भारतात संतापाची लाट पसरली. या हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दरम्यान न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटर केन विलियमसन पाकिस्तानमध्ये पोहचला आहे. केन 24 एप्रिलला पाकिस्तानमध्ये पोहचला. केन पाकिस्तानमध्ये पीएसएल 2025 स्पर्धेत खेळणार आहे. केनने यंदाच्या हंगामासाठी कराची किंग्स या संघासह करार केला आहे. केन याआधी आयपीएल 2025 स्पर्धेत समालोचन करत होता. अर्थात भारतात आयपीएल 2025 मधून पैसे कमावल्यानंतर आता केन पाकिस्तानमध्येही कमाई करणार आहे.

केनची पीएसएलमधून किती कमाई?

केनचं पीएसएलमधील हे पहिलचं वर्ष असणार आहे. केन पीएसएलमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. केन 25 एप्रिलला क्वेटा ग्लेडीएटर्स विरुद्ध त्याचा पहिला सामना खेळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केनला 50 हजार डॉलर्स अर्थात जवळपास 42 लाख 70 हजार रुपये मिळणार आहेत. केनला या हंगामातील पहिल्या 5 सामन्यांना मुकावं लागलं. केन या दरम्यान आयपीएल 2025 मध्ये कॉमेंट्री करत होता.

कराची टीमने केनसह नववर्षाच्या सुरुवातीलाच पीएसएल 2025 स्पर्धेसाठी करार केला होता. मात्र केनने आयपीएल 2025 मध्ये कॉमेंट्री करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे केन पीएसएल 2025 स्पर्धेतील काही सामन्यांत गैरहजर राहिला. केनने भारतातील करार पूर्ण केला. त्यानंतर आता केन पीएसएलमध्ये खेळताना दिसणार आहे. पीएसएल निमित्ताने केन आणि डेव्हीड वॉर्नर हे आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबादचे माजी सहकारी पुन्हा एकदा एकत्र खेळताना दिसणार आहेत. वॉर्नर या स्पर्धेत कराचीचं नेतृत्व करत आहे.

आयपीएल 2025 मध्ये अनसोल्ड

दरम्यान केन आयपीएलमध्ये अनेक वर्ष खेळला आहे. केनने 2015 ते 2024 या दरम्यान आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली आहे.  मात्र केनला आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमधून कोणत्याच टीमने घेतलं नाही. त्यामुळे केन अनसोल्ड राहिला. त्यामुळे केन आयपीएल 2025 मध्ये कॉमेंट्री टीमसह जोडला गेला होता. केन हा सनरायजर्स हैदराबादच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक राहिला आहे.

केन पीएसएल 2025 मध्ये खेळण्यासाठी सज्ज

केनची कामगिरी

केनने आयपीएल 2018 मध्ये आपल्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादला अंतिम फेरीत पोहचवलं होतं. केनने त्या मोसमातील 17 सामन्यांमध्ये 52.50 च्या सरासरीने आणि 8 अर्धशतकांसह 735 धावा केल्या. केन त्या मोसमात ऑरेंज कॅप विजेता फलंदाज ठरला होता. तसेच 2022 साली केन सनरायजर्स हैदराबाद टीमपासून वेगळा झाला. त्यानंतर केनने 2 हंगामात गुजरातचं प्रतिनिधित्व केलं. केनने आयपीएलमध्ये एकूण 79 सामन्यांमधये 35 च्या सरासरीने 2 हजार 128 धावा केल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.