आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा कमाल केली आहे. सुरुवातीला गुणतालिकेत नवव्या स्थानी होती. त्यात चार सामने गमवल्याने कमबॅक कठीण आहे असंच वाटत होतं. पण त्यानंतर सलग चार सामन्यात विजय मिळवून मुंबई इंडियन्सने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स नऊ सामने खेळली असून त्यात पाच सामन्यात विजय आणि चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. सलग चार सामने जिंकल्याने इतर संघांचे देखील धाबे दणाणले आहेत. आता मुंबई इंडियन्स पाचव्या विजयासाठी सज्ज झाली आहे. मुंबईचा दहावा सामना 27 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यासाठी मुंबईने खास रणनिती आखली आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने दुपारी सराव करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्सने या पर्वात एकही सामना दुपारी खेळलेला नाही. त्यामुळे कडक उन्हात खेळण्याची सवय नाही. त्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे खेळाडू दुपारी सराव करत आहेत. यामुळे कडक उन्हात खेळण्याची सवय होईल. कारण मुंबईत सध्या कडक ऊन पडतं. अशा स्थितीत जर भर उन्हात सराव केला नाही तर कठीण होऊ शकतं. यासाठी मुंबई इंडियन्स सराव संध्याकाळी न करता दुपारी करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर वेळी संध्याकाळचा सामना असल्याने संध्याकाळीच सराव केला जात होता.
आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव झाला होता. त्यानंतर गुजरात टायटन्से 36 धावांनी पराभूत केलं होतं. सलग दोन पराभवानंतर कोलकात्याला पराभूत केलं आणि कमबॅक केलं. कोलकात्याला 8 विकेट आणि 43 चेंडू राखून पराभूत केलं. पण त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सकडून 12 धावांनी पराभव झाला. आरसीबीकडूनही जिंकेल अशा स्थितीत असताना 12 धावांनी सामना गमवला. पण त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दोनदा सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं. 12 एप्रिलपर्यंत मुंबईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर होता. पण सलग चार विजयानंतर तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी 5 पैकी 3 सामने जिंकायचे आहेत.