Munawar Faruqui Post On Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. या घटनेनंतर देशभरातून संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे. यावर 'बिग बॉस' विजेता आणि स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारूकीने एक शायरी सोशल मीडियावर शेअर केली आहे, जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मुनव्वर फारूकीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक शायरी शेअर केली आहे, ज्यात त्यांनी लिहिले आहे की, "खुदा माफ नहीं करता, किसी के दिल को तोड़ना। फिर खून किसी बेकसूर का तो दूर की बात है। इंसाफ रह जायेगा पीछे, आगे होगी फिर से सियासत। मेरी जमीन पर मातम, तो यहां रोज की बात है।"
या ओळींमध्ये त्याने निर्दोष लोकांच्या हत्येवर शोक व्यक्त केला आहे आणि अशा घटनांनंतर राजकारण कसे पुढे येते, यावर टीका केली आहे. त्याने यापूर्वीही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर दहशतवाद्यांना फाशीची मागणी केली होती. मुनव्वरच्या या कवितेवर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सनी त्याच्या भावना समजून घेतल्या असून, त्याच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले आहे. तर काहींनी या कवितेतून व्यक्त झालेल्या राजकीय टीकेवर चर्चा केली आहे. एक नेटकरी म्हणतो, "खूप सुंदर, पण लोकांना कुठे समजत हे राजकारण आहे. तर दुसरा लिहितो, " आता निष्पापांच्या मृत्यूवर राजकारण होणं फॅशनच झाल आहे.
ची ही शायरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. त्याच्या या तून त्याने समाजातील विदारक वास्तव आणि राजकारणावर सडेतोड भाष्य केले आहे. त्याच्या या अभिव्यक्तीमुळे अनेकांनी त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि सामाजिक जाणीवेचे कौतुक केले आहे.