पिंपरी, ता. २४ ः डॉ. अशोककुमार पगारिया यांची प्रांतीय जैन भवन समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल जैन यांनी ही नियुक्ती केली. आकुर्डी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय महामंत्री अमित राय जैन यांनी ही नियुक्तीची घोषणा केली. डॉ. अशोककुमार पगारिया हे गेल्या २० वर्षांपासून जैन कॉन्फरन्सच्या विविध पदांवर काम करीत आहेत. यापूर्वी ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. जैन कॉन्फरन्सच्या तेरा प्रांतांमध्ये जैन भवन निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
फोटोः 09115