swt2412.jpg
59620
विलास रूमडे, गिरीश धोपटे
मानवाधिकार राजदूत संघटना
देवगड तालुकाध्यक्षपदी रूमडे
देवगड, ता. २४ः आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी विलास रूमडे यांची तर सचिवपदी गिरीश धोपटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
संघटनेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची सभा जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी दयानंद तेली यांच्या अध्यक्षतेखाली येथे झाली. यावेळी विलास रूमडे यांची तालुका अध्यक्षपदी तर गिरीश धोपटे यांची सचिवपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी विलास रूमडे, गिरीश धोपटे यांच्यासह शामल जोशी, रविकांत चांदोस्कर, संतोष पांचाळ, नंदकुमार परब, हर्षा ठाकूर, जानवी नाथगोसावी, शुभांगी तेली, शुभांगी राणे आदी उपस्थित होते.