रोजचा स्वयंपाक होईल अतिशय चवदार! पारंपरिक मराठवाडी पद्धतीने घरीच बनवा काळा मसाला, भाज्यांची चव लागेल सुंदर
News Update April 25, 2025 08:24 AM
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक घरात मसाले, वाळवणाचे पदार्थ, लोणचं, कुरडया इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. वर्षभर पुरतील एवढ्या प्रमाणात घरीच पदार्थ तयार केले जातात. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने तिखट मसाला तयार केला जातो. लाल तिखट, घाटी मसाला, मालवणी मसाला, कला मसाला इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ वापरून मसाले तयार केले जातात. त्यातील चिकन मटण बनवताना वापरला जाणारा मसाला म्हणजे काळा मसाला. काळ्या मसाल्याचा वापर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो. या मसाल्यामध्ये भाज्या, चिकन, मटण आणि इतरही पदार्थ बनवले जातात. मात्र बऱ्याचदा हा मसाला विकत आणून जेवणात वापरला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अस्सल मराठवाडी पद्धतीने काळा मसाला बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. यामुळे घरी बनवलेल्या पदार्थांची चवही वाढेल आणि सगळेच जण आनंदाने जेवतील. (फोटो सौजन्य – iStock)
वाटीभर रवा आणि हापूस आंब्यांपासून १० मिनिटांमध्ये बनवा मऊसुत शिरा, घरातील सगळेच करतील गोड कौतुक
पारंपरिक पद्धतीने काळा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात लवंग आणि काळीमिरी टाकून व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजा.
त्यानंतर त्रिफळा, 10 ग्रॅम बादियान आणि 25 ग्रॅम दालिचनी टाकून सर्व मसाले पुन्हा एकदा लाल होईपर्यंत भाजा.
सुंठ, बडीशेप, जिरे, राम पत्री, शहाजिरे, जावित्री, काळी वेलची, 1 जायफळ घालून भाजून घ्या. ते झाल्यानंतर वेलची,कपूर चिनी, खसखस, हिंग हे सर्व खडे मसाले वेगवेगळे भाजून घ्या. मसाले भाजताना त्यात तेल किंवा इतर कोणतेही पदार्थ टाकू नये.
त्यानंतर तेल टाकून त्यात दगडफूल आणि तेजपत्ता एकत्र व्यवस्थित भाजा.
मसाला तयार करताना सगळ्यात शेवटी कढईमध्ये सूख खोबरं भाजून घ्या. त्यानंतर त्याच कढईमध्ये उभा बारीक चिरून घेतलेला
कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्या.
लाला मिरचीचे तुकडे करून ३ ते ४ वेळा उन्हामध्ये व्यवस्थित शेकवून नंतर थंड करून घ्या.
सर्व मसाले एकत्र मिक्स करून बारीक दळून घ्या. तयार आहे मराठवाडी पद्धतीने बनवलेला काळा मसाला.