पंचांग -
शुक्रवार : चैत्र कृष्ण १२, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ६.५०, चंद्रोदय पहाटे ४.३५, चंद्रास्त दुपारी ४.२१, प्रदोष, भारतीय सौर वैशाख ५ शके १९४७.
दिनविशेष -
२००४ - पंधरा महिन्यांत जगप्रवास पूर्ण करून ‘तरंगिणी’ ही भारतीय नौदलाची शिडाची नौका कोची बंदरात परतली. १८ देशांना आणि ३६ बंदरांना भेट आणि ३३ हजार सागरी मैलांचा प्रवास केला.
२०१६ - रोईंग क्रीडाप्रकारात ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या भारताच्या दत्तू बबन भोकनळ याने आशियायी पात्रता फेरीत रौप्यपदकाची कमाई केली.