केसांची योग्य काळजी घेणे हे प्रत्येकासाठी आव्हान असते. अशातच पुर्वी अनेक महिला या रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावून आणि बांधत असत. कारण यामुळे केस गुंतणार नाहीत व रात्रभरात केसाना तेलाचे योग्य पोषण मिळेल.ज्याने केस वेगाने वाढतील. पण याबद्दल मनात एक प्रश्न नक्कीच उद्भवतो की, हे करणे केसांसाठी खरोखर फायदेशीर आहे का? केस घट्ट बांधण्याबाबत आपल्या मनात अनेक प्रश्न येतात, केस घट्ट बांधल्याने स्कॅल्पला खाज सुटणे, डोकेदुखी इत्यादी समस्या उद्भवतील का? एवढेच नाही तर त्यामुळे डोकेदुखी आणि केस जलद गळणे यासारख्या समस्या निर्माण होतील का?
त्याच वेळी, बरेच लोकं असे मानतात की रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचे केस व्यवस्थित बांधले पाहिजेत, ते घट्ट बांधणे किंवा बनमध्ये बांधणे आवश्यक नाही. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचे केस जितके जास्त उघडे किंवा मोकळे ठेवाल तितके ते त्यांच्या वाढीसाठी चांगले. आज या लेखाद्वारे आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की केस घट्ट बांधून झोपणे केसांसाठी चांगले आहे का? तसेच, आपल्याला त्यामुळे होणारे नुकसान कळेल, जे आपण अनेकदा दुर्लक्षित करतो.
केस घट्ट बांधून झोपल्याने स्कॅल्पमध्ये या समस्या उद्भवतात
केस घट्ट बांधून झोपल्याने स्कॅल्पवर दबाव येतो आणि तणावासारख्या समस्या देखील निर्माण होतात. यामुळे झोपेशी संबंधित डोकेदुखी आणि अस्वस्थता या समस्या निर्माण होतात. तसेच केस घट्ट बांधून झोपल्याने त्याचा वाढीवरही नकारात्मक परिणाम होतो.
सतत केस गळणे
केस घट्ट बांधल्याने केस गळतीची समस्या वाढू शकते. खरंतर, केस घट्ट बांधल्याने केसांच्या मुळांवर खूप ताण येतो. यामुळे केस ओढले जातात आणि मुळापासून तुटतात. अशातच स्कॅल्पच्या छिद्रांना खूप नुकसान होते. विशेषतः जेव्हा तुम्ही केस घट्ट बांधण्यासाठी घट्ट रबर किंवा हेअर टाय वापरता तेव्हा ही समस्या खूप वाढू शकते.
ट्रॅक्शन अलोपेसिया
घट्ट केस बांधल्यामुळे स्कॅल्पवर खूप ताण येऊ शकतो. यामुळे तुमचे केस पातळ होणे आणि केस गळण्याची समस्या वाढू शकते. ट्रॅक्शन अलोपेसिया सारखा केसांशी संबंधित आजारही होऊ शकतो.
केसांच्या वाढीवर त्याचा वाईट परिणाम होतो
केस घट्ट बांधल्याने केसांच्या नैसर्गिक वाढीवर खूप नकारात्मक परिणाम होतो. कारण यामुळे स्कॅल्प आणि त्याच्या छिद्रांमध्ये रक्ताभिसरणात खूप समस्या होतात.
झोपण्यापूर्वी केस अशा प्रकारे बांधू नका
झोपण्यापूर्वी घट्ट पोनीटेल आणि बन बांधणे टाळा. झोपण्यापूर्वी, केस सैल बांधा आणि जाड रबर बँड वापरा. केस मोकळे ठेवून झोपा, यामुळे तुमच्या टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारेल. सॉफ्ट हेअर डाई वापरा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)