आधीपासूनच खराब असलेले भारत-पाकिस्तान संबंध पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अजून तणावपूर्ण बनले आहेत. मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार निलंबित केला. भारताच हे पाऊल म्हणजे ‘एक्ट ऑफ वॉर’, युद्धाला निमंत्रण देण्यासारख आहे असं पाकिस्तानने म्हटलय. पाकिस्तानातील नावाजलेले नेते आणि माजी खासदार फैसल वावडा यांनी म्हटलय की, “पाकिस्तान पाण्याच्या मुद्यावर युद्ध लढेल. यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही”
ARY न्यूजच्या प्रोग्रॅममध्ये बोलताना फैसल वावडा म्हणाले की, “आमच्या लष्करप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलय की, आम्ही पाण्याच्या मुद्यावर युद्ध लढणार. यात कुठलीही तडजोड करणार नाही. आम्ही इतके पुढे जाऊ की, तिथून मागे फिरणं कठीण असेल. युद्ध झालच तर ती फक्त भारत-पाकिस्तानची लढाई नसेल. संपूर्ण क्षेत्रात हे युद्ध पसरेल. आंतरराष्ट्रीय घटकांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल”
‘…तेव्हा पाकिस्तान वाट पाहणार नाही’
फैसल वावडा एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी अनेक पोकळ बाता केल्या. “विषय पाण्यावर येईल, तेव्हा पाकिस्तान वाट पाहणार नाही. लगेच प्रतिक्रिया देईल. विषय पाण्याचा असेल, तेव्हा आम्ही सुरुवात करु. तुम्हाला माहितीय पाकिस्तानची आर्मी, नेवी आणि एअरफोर्स किती शक्तीशाली आहे. एअरफोर्सबद्दल तुम्हाला माहितीय, माशासारखे आधी पकडतात आणि नंतर मारतात” अशा पोकळ गोष्टी फैसल वावडा या कार्यक्रमात बोलून गेले.
संरक्षण बजेटमध्ये भारत खूप पुढे
भारताकडे रणनितीक आणि टेक्निकल ताकद पाकिस्तानपेक्षा कैकपटीने जास्त आहे. संरक्षण बजेटमध्ये सुद्धा पाकिस्तान भारतापुढे कुठे टिकत नाही. भारताच 2025-26 वर्षाच संरक्षणाच बजेट 79 अब्ज डॉलर खर्च केलेत. तेच पाकिस्तानच संरक्षण बजेट त्यापेक्षा कमी आहे.