पंकाजा मुंडे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील मेंढपाळांना अनुदानाची रक्कम देण्यात आली आहे. 3054 मेंढपाळांना सन 2024-25 या वर्षासाठी चराई अनुदानापोटी 7.33 कोटी रुपयांचे अनुदानाचे थेट हस्तांतरण (डीबीटी) द्वारे बँक खात्यात जमा केले आहे. मेंढ्यांच्या चराईकरिता राज्यातील मेंढपाळांना अर्थ सहाय्य उपलब्ध झाल्यामुळं मेंढपाळांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत्र निर्माण झाला आहे. त्यांच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागला असल्याची भावना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये मेंढीपालन व्यवसाय हा पूर्णपणे स्थलांतरित पद्धतीने केला जातो. पावसाळी हंगामामध्ये मेंढपाळ त्यांच्या मूळ गावी परत आल्यानंतर पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेंढ्यांना चराई करिता क्षेत्र उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होतात असे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळे,चाऱ्याअभावी मेंढ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांची उत्पादकता कमी होऊन मेंढपाळ कुटुंबाचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे राज्यामधील मेंढपाळ कुटुंबाना माहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेंढ्यांसाठी चाऱ्याची कमतरता भरून काढण्यासाठी चराई अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन विभाग व इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत राबवली जात असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..