डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकारण! मनीषा मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Marathi April 25, 2025 05:33 PM

डॉ. शिरिश वलसंगकर: डॉ. शिरीष वळसंगकर (Dr Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्या प्रकारणातील आरोपी मनीषा मुसळे माने हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आरोपी मनीषा मानेला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती तपासाधिकाऱ्यांनी केली होती. पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचे हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन कोठडी देण्याची तपासअधिकाऱ्यांची न्यायालयात मागणी केली होती.

मनीषा माने विरोधात पोलिसांच्या तक्रारी

सरकारी पक्षाची बाजू ऐकत मुख्य न्यायादंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी मनीषा मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत असून, हॉस्पिटलमधील अनेक कर्मचाऱ्यांनी आरोपी मनीषा माने-मुसळे यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलिस तपास सुरू आहेत. याशिवाय फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर, शोनाली वळसंगकर आणि इतर संबंधित व्यक्तींचेही जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून, लवकरच डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या खऱ्या कारणांचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापूरमधील सुप्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. त्यांचे वय 69 वर्षे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस’ हे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्यात आले. 1999 साली हे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी कार्यरत झाले. डॉ. वळसंगकर यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथे पूर्ण केले. त्यानंतर डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून त्यांनी एम.बी.बी.एस. व एम.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून एम.आर.सी.पी. (यूके) ही पदवी मिळवली. देशातील अग्रगण्य मेंदूविकार तज्ञांपैकी एक म्हणून त्यांची ख्याती होती. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांतील रुग्णांसाठी एसपीएम न्यूरो हॉस्पिटल हे आशेचे केंद्र ठरले आहे. या रुग्णालयात न्यूरोलॉजीशी संबंधित निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि संशोधन यासाठी आधुनिक उपकरणे व दर्जेदार सुविधा उपलब्ध आहेत.

18 एप्रिलला डॉ. वळसंगकरांनी केली होती आत्महत्या

शुक्रवारी (18 एप्रिल) रात्री 8 वा. एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले. रात्री 8:30 बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला.  त्यानंतर दुसरी राउंड फायर झाल्यावर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले.  रात्री 9 वा. त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आले.  मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांच्यासह 5 तज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. रात्री 10:20 मिनिटांनी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना मृत घोषित करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी: सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, ओळखही पटली

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.