Maharashtra Live Update : भारताचा ताकद दाखवून द्या - मोहन भागवत
Sarkarnama April 25, 2025 11:45 PM
भारताचा ताकद दाखवून द्या - मोहन भागवत

पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारताची ताकद दाखवून द्या. हिंदू कधीही कोणाला धर्म विचारून मारणार नाही. मात्र. त्या लोकांनी ते केले आहे. फक्त ताकद असून उपयोग असून उपयोग नाही ती दाखवलीही पाहिजे.

Pahalgam Terror Attack : दोन दहशतवाद्यांची घरं भारतीय सुरक्षा दलाने उद्ध्वस्त केली

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याशी संबंधित असलेले दोन स्थानिक दहशतवादी आदिल थोकर आणि आसिफ शेख यांची घर भारतीय सुरक्षा दलाने गुरुवारी रात्री उद्ध्वस्त केली आहेत.

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक; 2 पोलिस जखमी

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शोध मोहीम राबवली आहे. याचवेळी आज बांदीपोरा येथे पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला आहे, तर दोन पोलिसांना गोळी लागल्याची माहिती आहे.

Nashik News : नाशिकमधील 6 पाकिस्तानी महिलांना देश सोडवा लागणार

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडून जाण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत. तर नाशिक पोलिसांना याबाबतचा फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यलयाकडून अद्याप कोणतेही लेखी आदेश नाही. मात्र, तसा आदेश येताच सरकारच्याआदेशानुसार पोलिस कारवाई करतील. त्यामुळे नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या 6 पाकिस्तानी महिलांना देश सोडवा लागणार आहे.

Simla Agreement : पाकिस्तानकडून सिमला करार स्थगित

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत सिंधू पाणी करार रद्द केला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानने देखील सिमला करार स्थगित केला आहे.

Rahul Gandhi visit Kashmir : राहुल गांधी आज काश्मीर दौऱ्यावर

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज काश्मीरला जाणार आहेत. ते जीएमसी अनंतबाग येथे जखमींना भेटणार आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधी काश्मीरला जात असल्याने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.