Maharashtra News Live Updates : शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी
Saam TV April 26, 2025 02:45 AM
शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी

चार इंस्टाग्राम अकाउंटवरून शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली

अभिमन्यू खोतकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

Pune: राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एन आय ए) पथक पुण्यात दाखल होणार

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही कुटुंबियांची घरी एन आय ए चे पथक भेट देणार

गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांकडून एन आय ए घेणार संपूर्ण घटनेची माहिती

दहशतवादी हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमाचा एन आय ए अधिकारी नोंदवणार जबाब

कालपासून एन आय ए च्या पथकांकडून महाराष्ट्रातील मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची घरी जाऊन जबाब नोंदवण्याचे काम सुरू

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास एन आय ए कडून सुरू आहे

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक धास्तावले, शेकडो पर्यटकांनी केलेल्या काश्मीरचे बुकिंग रद्द

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला .

या घटनेनंतर काश्मीरमध्ये फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे . जे काश्मीरमध्ये आहेत ते तेथून काढता पाय घेतायत तर ज्यांना जायचं होतं ,

बुकिंग केल्या होत्या, त्या नागरिकांनी आता बुकिंग रद्द करण्यासाठी ट्रॅव्हल एजन्सीला फोन करण्यास सुरुवात केली आहे. .

काश्मीरच नव्हे तर काश्मीरच्या आजूबाजूला असलेले लडाख,गुलबर्ग आदी भागात जाण्यासाठी केलेल्या बुकिंग देखील भीतीपोटी रद्द करण्यात आल्या आहेत. .

याबाबत देशपांडे ट्रॅव्हल्सचे प्रथमेश देशपांडे यांनी संगितले की ,370 कलम हटवल्यानंतर काश्मीर व आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी पर्यटन वाढलं होतं .सुट्ट्यांमध्ये 600 ते 700 बुकिंग होत होत्या .

मात्र दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आणि त्यानंतर नागरिक घाबरले . काश्मीर ची बुकिंग रद्द करण्यासाठी आम्हाला दिवसभर फोन येतायत.

अगदीच हल्ला होण्याच्या आदल्या दिवशी देखील बुकिंग साठी फोन येत होते मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे .

काश्मीरच्या काश्मीर नव्हे तर काश्मीरच्या आजूबाजूच्या परिसरात आजूबाजूच्या राज्यांमध्ये देखील नागरिक जाण्यास घाबरत आहेत .

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद व निषेध आंदोलन

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्वच हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने बंदच आवाहन..

काही वेळातच वाहली जाणार मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली...

राजकमल चौक ते जिल्हाधिकारी कार्यलय पर्यत काढली जाणार निषेध रॅली..

अमरावती बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चौक बंदोबस्त..

पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी निषेद आंदोलन केलं जात आहे.

आज अमरावतीतही निषेध आंदोलनाच आयोजन करण्यात आल आहे.

याच अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये 2021 मध्ये रजा अकादमीच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला होता.

त्यावेळी या ठिकाणी दंगल उसळली होती. त्यामुळे या बंदला पोलीस कशाप्रकारे हाताळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

सकल हिंदू समाजाचा येवल्यात निषेध मोर्चा

नाशिकच्या येवला शहरात आज भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला,येवल्यातील गोरक्षकांवर झालेला हल्ला व पहेलगाम येथे दाहशवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला

तर शहरात सकाळ पासून कडकडीत बंद सुद्धा ठेवण्यात आला आहे,

वनवासी श्री राम मंदिर येथून मोर्चाला सुरवात होऊन तो शहरातील विविध भागातून विंचूर चौफुली येथे आल्यावर शासनाच्या प्रतिनिधींना निवेदन देण्यात आले

या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी येवल्यातील महिला,पुरुष,तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,

या भ्याड हल्ल्याच्या घटनेतील प्राण गमावलेल्या कुटुंबियांना न्याय मिळावा,हिंदूंवर वारंवार होणारे हल्ले थांबवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Amravati: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद

अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार ठप्प

राम कृषी उत्पन्न बाजार समितीतील करोडो रुपयांच्या खरेदी विक्रीला लागला ब्रेक

200 पेक्षा अधिक व्यापारी आणि अडत्यांनी बंद केली संपूर्ण बाजारपेठ

बंदमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलावाला लागला ब्रेक

पूर्वसूचना न देता बाजारपेठ बंद केल्याने शेतकऱ्यांची नाराजी

अवकाळी पावसाने शेतमाल खराब झाल्यास शेतमालाची हमी कोण घेणार शेतकऱ्यांचा सवाल

शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल शेतमाल बाजारपेठेत पुडून

आम्हाला पूर्व सूचना न देता बाजारपेठ बंद ठेवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप...

कार दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी; पुसद ते हिंगोली मार्गावरील घटना

यवतमाळच्या पुसद ते हिंगोली मार्गावरील आमदरी हिवळणी घाटात भरधाव कार ने दुचाकीला चिरडले यामध्ये दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला

तर त्याच्यासोबत असलेल्या दोन सहकारी गंभीररित्या जखमी झाले.

उमेश जमदाडे असे मृतकाचे नाव आहे असून मिलिंद वाहुळे,नितीन जमदाडे असे जखमींचे नाव आहे.

हे तिघेजण शेंबाळपिंपरी वरून पुसद कडे जात असताना हा भीषण अपघात झाला.

अपघात एवढा भीषण होता की उमेश जमदाडे याचा उजवा पाय कमरेतून तुटून 50 फुटावर जाऊन पडला

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले असून कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे

Nashik: नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील दर्गा प्रकरण

- पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत आरोपी असलेला टिप्पर गँगचा समीर पठाण उर्फ छोटा पठाण याचा जुगार अड्डा पोलिसांकडून उध्वस्त

- इंदिरानगर परिसरात अवैधपणे चालवत होता जुगाराचा अड्डा

- गुन्हे शाखेने छापा टाकत 70 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

- व्यापाऱ्यांच्या अपहरण आणि खंडणी प्रकरणात देखील समीरचा भाऊ शाकीर पठाणचा सहभाग असण्याची शक्यता

- शहरातील कार डेकोर व्यावसायिक निखिल दर्याणी यांचे 4 एप्रिलला झाले होते अपहरण

Bhandara: भंडाऱ्याच्या तुमसरात डम्पिंग यार्डला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचा प्रयत्न

भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगरपालिकेच्या डोंगरगाव येथील डम्पिंग यार्डला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली.

त्यानंतर आगीचे लोट दिसू लागल्याने नागरिकांनी याची माहिती नगरपालिका प्रशासनाला दिल्यानंतर तुमसर नगरपालिका आणि भंडारा येथूनही अग्निशमन बंब बोलवून आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला.

आग आटोक्यात आली असली तरी, आगीमुळं निघालेला धूर आणि केमिकलयुक्त साहित्य जळाल्यानं त्याच्या दुर्गंधीमुळं परिसरातील गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागलाय.

आधीच नेमकं कारण कळू शकलं नसलं तरी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आलं असून आगीचं कारण आता शोधण्यात तुमसर नगरपालिका प्रशासन लागलं आहे.

उन्हाळ्याचे पन्नास दिवस शिल्लक असताना हिंगोली तलावात केवळ 30 टक्के पाणीसाठा

महाराष्ट्रात सध्या तापमानाची प्रचंड लाट पसरली आहे वाढत्या तापमानामुळे माणसाच्या अंगाची लाहीलाही होत असताना आता याच तापमानाचा हिंगोली जिल्ह्यातील साठवण तलावांना देखील फटका बसला आहे हिंगोलीच्या आंभेरी साठवण तलावात पाणी पातळी दररोज घटत असल्याने आता केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे, परिसरातील 10 गावचा पाणी प्रश्न या तलावावर अवलंबून आहे त्यासोबतच या भागात जंगलातील जनावरे व शेतकऱ्यांचे पशु याच तलावामधून आपली तहान भागवतात मात्र पाणीसाठा घटत असल्याने पुढील काही दिवसांमध्ये प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक बुर्जी धरणात केवळ ११.८६ टक्के जलसाठा शिल्लक

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात केवळ ११.८६ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे,

हा जलसाठा दीड ते दोन महिनेच पुरेल असा अंदाज व्यक्त केला जात असल्याने वाशिम शहराला पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वाशिम शहराला सहा ते आठ दिवस आड तर काही भागात दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

४० दिवसांपूर्वी याच धरणात ३०.०८ टक्के जलसाठा शिल्लक होता मागील ४० दिवसात जवळपास २० टक्के जलसाठ्यात घट झाली आहे.

वाढत्या तापमानामुळे पाणी साठ्यात झपाट्याने घट झाली तर सिंचनासाठी पाणी घेण्यास बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने धरणात सध्या ११.८६ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.

Badlapur: जम्मू काश्मीरमधील हल्ल्याचा बदलापुरात मविआकडून निषेध

जम्मू काश्मीरमधील पहेलगाममध्ये दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा बदलापुरात मविआकडून निषेध करण्यात आला.

बेलवलीच्या उड्डाणपूल चौकात पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडा जाळत मविआच्या नेत्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

जम्मू काश्मीरच्या पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 28 निरपराध भारतीयांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे.

या भ्याड हल्ल्याचा बदलापुरातील मविआ नेत्यांनी निषेध केलाय. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या तसंच पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडाही जाळण्यात आला.

हा दहशतवादी हल्ला म्हणजे मोदी शहांचं मोठं अपयश आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी मविआ नेत्यांनी केली.

Mumbai News: शिंदे गटाच्या बॅनरवरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो गायब

शिवसेना शिंदे गटाच्या बॅनर वरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो गायब

दिल्लीत होणाऱ्या महाराष्ट्राच्या हापूस आंबा महोत्सवाचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी स्थानकाबाहेर लावलेल्या बॅनरवरून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो गायब

शिवसेना ठाकरे गटाचा रवींद्र वायकर यांच्यावर निशाणा

शिवसेना खासदार बाळासाहेब ठाकरे यांना विसरकेत का असे म्हणत फेसबुक पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटाचे अमित पेडणेकरं यांनी साधला निशाणा

बॅनर वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक मोठा फोटो दिसत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे दिसत आहेत

तर आयोजक म्हणून खासदार रवींद्र वायकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो दिसत आहे.

Jalgaon News: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावच्या जामनेरमध्ये कडकडीत बंद

जळगावच्या जामनेरमध्ये पहलगाम येथील घटनेच्या निषेधार्थ आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे

जळगावच्या जामनेर मध्ये आज व्यवसायिक दुकानदार तसेच सर्व नागरिकांच्या वतीने आपली दुकान बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे..

संपूर्ण जामनेर शहर तसेच तालुक्यात सर्वच दुकाने व्यवसाय आज सकाळपासून उघडले नसून बंद पाळण्यात येत आहे.

जामनेर शहरातील तसेच तालुक्यातील सर्व व्यवस्थित व्यापारी दुकानदार तसेच नागरिक बंदमध्ये सहभागी झाले आहेत...

संपूर्ण जामनेर शहर आज सकाळपासून बंद असून शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे

पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ जामनेर शहरात आज बंद पाळण्यात येत आहे...

Nahik News: नाशिकमध्ये देखील वेगवेगळ्या कारणांनी ६ पाकिस्तानी महिलांचं वास्तव्य

- वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तानी महिलांना देश सोडावा लागणार

- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानंतर पाकिस्तानी महिलांना भारत सोडून जावं लागणार

- नाशिक पोलिसांना मात्र फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यालयाकडून कोणतेही लेखी आदेश नाही

- फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यालयाकडून आदेश येताच नाशिक पोलिसांकडून आदेशाप्रमाणे केली जाणार कारवाई

- भारत - पाकिस्तान मधील तणावाच्या संबंधामुळे नाशिकमध्ये व्हिसा घेऊन राहणाऱ्या पाकिस्तानी महिलांना जावं लागणार मायदेशी

Ratnagiri: गणपतीपुळे मंदिरात खास आंब्यांची आरास

रत्नागिरी जवळच्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यात आज आकर्षक अशी फळांची आरास करण्यात आली आहे.

फळांचा राजा अर्थात हापूस आंब्याची आरास आज गणपतीपुळ्याच्या मंदिराच्या गाभाऱ्यात करण्यात आलीय.

सध्या हापूस आंब्याचा सिझन आहे त्यामुळे गणरायाला आज ही आंब्याची आरास करण्यात आलीय.

हे आंबे नंतर भाविकांना प्रसाद म्हणून दिले जातात.

Satara: मद्य धुंद पोलिसांनी झोपलेल्या व्यक्तीला चिरडले

कोरेगाव तालुक्यातील सर्कल वाडी येथील दुर्देवी घटना...

रमेश लक्ष्मण सपकाळ या व्यक्तीला रात्री उशिरा भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने घराच्या अंगणातच चिरडले...

अपघातात रमेश लक्ष्मण सपकाळ 45 यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू...

वाहन चालक असणारा पोलीस मद्यधुंद असल्याची प्राथमिक माहिती..

डाळ मीलला आग, आगीत तीस लाखांचे साहित्य जळून खाक

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंबोडा येथील मातोश्री उर्मीलाबाई राऊत दाल मील आणि ऑईलमीलला शाॅट सर्किटमुळे आग लागल्याने मील मधील चना डाळ, तूर डाळ आणि ऑईल संपूर्ण जळून खाक झाल्याने तीस ते चाळी लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती असून मध्यरात्री लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण करित संपूर्ण मिल मधिल साहित्य जळून खाक झालीय.दरम्यान आर्णी नगर परिषदेचे अग्निशमन दलाच्या जवानांकडून उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.

जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा खामगाव येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने निषेध

जम्मू काश्मीर येथील पहेलगाम येथे आतंकवाद्याकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील खामगाव येथे हिंदू समाजाच्या वतीने खामगाव येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

हा हल्ला देशाच्या एकता आणि अखंडतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन याचा निषेध केला पाहिजे.  

सरकारने सर्व पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी आणि या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारने लवकरच योग्य ती पावले उचलावीत.

हा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दहशतवादी विरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात यावा.

तसेच कश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षित रिते महाराष्ट्रात आणण्यात यावा अशी सुद्धा मागणी त्यांनी यावेळेस केली आहे.

Amravati: पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी केले बंदचे आव्हान

विश्व हिदू परिषद व बजरंग दलाने केले अमरावती बंदचे आव्हान

अमरावती शहरातील दुकान बंद ठेवून अमरावतीच्या राजकमल चौकात पहलगाम येथील झालेल्या हल्ल्याचा नोंदवणार निषेध....

अमरावतीमध्ये व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ठेवले दुकान बंद......

याच अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये 2021 मध्ये रजा अकादमीच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला होता.

त्यावेळी या ठिकाणी दंगल उसळली होती. त्यामुळे या बंदला पोलीस कशाप्रकारे हाताळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

Nanded Band: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड बंदची हाक

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात निष्पाप 28 जणांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला.

या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण देशभरात तीव्र निषेध करण्यात येतोय.

या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड बंदची हाक देण्यात आलीय.

सर्व पक्ष संघटनाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आलाय.

या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय. या बंदच्या पार्श्वभूमीवर दहा वाजता मोटार सायकल रॅली निघणार आहे.

या रॅलीत नांदेडकर मोठ्या संख्येने सहभागी होत घटनेचा निषेध करतील.

Dharashiv: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत धाराशिवमध्ये काढला कँडल मार्च

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिव मध्ये तिव्र निषेध करण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला

तर छञपती शिवाजी महाराज चौकात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले

सरकारने या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करुन बदला घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली.

यामध्ये शहरातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Nagpur News: चामोर्शी भिवापूर मार्गे नागपूरला येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सचा मनोरा फाटावर अपघात

- चामोर्शी भिवापूर मार्गे नागपूरला येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सचा मनोरा फाटावर अपघात होऊन रस्त्या लगतच्या नाल्यात पलटली.

- या अपघातात 35 ते 40 जण जखमी झाले.. तेच 7 ते 8 जणांना दुखापत झाली.. ही घटना बुधवारी दुपारी घडलीय.

- घटनेनंतर जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी मोठी दुर्घटना टळली.

- या घटनेत ट्रॅव्हल्सची चालक सचिन धकाते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Nagpur: नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आणखी दोघांना अटक

- नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे... शिवदास ढवळे आणि सागर भगोले असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे...

- बोगस शिक्षक भरती प्रकरणी शालार्थ आयडी या शिक्षण विभागाच्या संगणकीय प्रक्रियेचा गैरवापर झाल्या प्रकरणी सध्या नागपूरच्या सायबर पोलिसांचा प्रकरणात समांतर तपास करत आहे...

- सायबर सेलने यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयात कर्मचारी असलेल्या शिवदास ढवळे तसेच मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या शालेय शिक्षक सागर भगोले या दोघांना अटक केली आहे...

याप्रकरणी नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह एकूण 7 जण आधीच अटकेत आहेत.

Pune: पुणे जिल्हा नियोजन समितीची आज बैठक

बैठकीत 1,379 कोटी रुपयांच्या कामाचा आराखडा मांडण्यात येणार

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे

जानेवारी महिन्यात झालेल्या बैठकीत 1,256 कोटी रुपयांची वार्षिक आराखडा होता ..मात्र त्यात आता 123 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली

त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इतर विकास कामांबाबत चर्चा होणार आहे त्यासाठी स्थानिक आमदार खासदारांकडून कामांची यादी ही मागवली जाण्याची शक्यता आहे

Pune Latest News: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल

शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल शाळा लॉगीनमधून, तसेच पालकांना पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात घेण्यात आली. पाचवीच्या ५ लाख ४६ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या ३ लाख ६५ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

अंतरिम निकाल www. mscepune. in U https:// puppssmsce. in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

Pune News: पुण्यात आरोग्य भवनच्या इमारतीचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात आरोग्य भवनाच होणार भूमिपूजन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नवीन २० रुग्णालयाचे अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर देखील कार्यक्रमाला उपस्थितीत

Dharashiv: धाराशिव शहरातील झोरे गल्लीतील नाली व रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले

धाराशिव शहरातील झोरे गल्लीतील नाली व रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे.

त्यामुळे नालीतील पाणी रस्त्यावर येत आहे तसेच डुक्करांचा वावर देखील वाढला आहे.

त्यामुळे रोगराई निर्माण होत असुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

त्यामुळे रखडले नालीचे व रस्त्याचे काम तातडीने करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत नागरीकांनी नगर परिषद प्रशासनाला निवेदन देखील दिले असुन लवकरात लवकर मागणीकडे लक्ष द्यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Pandharpur: पहलगाम घटनेचा पंढरपुरात निषेध आंदोलन

काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पंढरपुरात हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध करत पाकिस्तान विरोधात आंदोलन केले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत हल्ल्याचा निषेध करत आंदोलन केले.

यावेळी दहशतवाद्यांच्या प्रतिमांची होळी करत पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली

Washim: पाणीटंचाईचा भीषण फटका; फुलावर आलेल्या मुगाच्या पिकात शेतकऱ्यांनी सोडल्या बकऱ्या

वाशिम जिल्ह्यात यंदा उन्हाळी मुगाच्या पेरणीला चांगला प्रतिसाद मिळालेला असताना अचानक उभी राहिलेली पाणीटंचाई शेतकऱ्यांसाठी मोठं संकट बनली आहे.

मुगाच पिकं फुलांवर असतानाच पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मुगात चरण्यासाठी बकऱ्या सोडल्या आहेत.

ढिल्ली येथे बॅरेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाळी पेरणी झाली होती.

यंदाही यंदाही सुमारे सुमारे २०० ते ३०० एकरवर पेरणी झालीये. मात्र, बॅरेज कोरडे पडल्यामुळे व विहिरी, कूपनलिकांमध्येही पाणी नसल्यानं सुमारे १०० एकरवरील पिके सुकली.

परिणामी, शेतकऱ्यांनी उत्पादनाची आशा सोडून उभ्या पिकातच गुरे व शेळ्या सोडल्या आहेत.

पुण्यात १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास, 3 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला

शहरात सध्या १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून, त्यापैकी ९१ जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत. तसेच आतापर्यंत तीन पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती शहर पोलिस दलातील परकीय नागरिक विभागाने (एफआरओ) दिली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा वैद्यकीय उपचारासाठी भारतात येतात. या नागरिकांमध्ये बहुसंख्येने दीर्घ मुदतीचा व्हिसा घेतलेले आहेत.

हा व्हिसा पाच वर्षांसाठी वैध असतो, तर व्हिजिटर व्हिसा ९० दिवसांचा असतो.

पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांची संख्या

दीर्घ मुदतीच्या व्हिसावर - ३५ पुरुष, ५६ महिला

व्हिजिटर व्हिसावर - २० नागरिक

Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये अडकलेले २३२ पर्यटक आज महाराष्ट्रात परतणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्याच्या प्रक्रियेला आणखी गती दिली असून तिसऱ्या विशेष विमानाची व्यवस्था केली आहे.

आज दुपारी ३ वाजता आणखी २३२ पर्यटक श्रीनगर येथून मुंबईकडे निघणार आहेत.

आपण उपलब्ध केलेल्या विमानांपैकी हे तिसरे विशेष विमान २३२ पर्यटकांना महाराष्ट्रात मोफत आणणार आहे.

Pune News: पुण्यात येथे पहलगाम हल्ल्याचा निषेध

हल्ल्यात निष्पाप भारतीयांच्या हत्येचा निषेध करण्यात आला

या हल्ल्यात पुण्यातील ही दोघांना आपला जीव गमावा लागला आहे

कोंढव्यात मुस्लिम बांधव यांनी कोणार्क इंद्रायू मॉल येथे निषेध आंदोलन केलं

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर

सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी

सकाळी आठ वाजता आरोग्य भवन भूमिपूजन कार्यक्रमाला आरोग्य मंत्री ही असणार उपस्थितीत

नऊ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक

साडे अकरा वाजता बालगंधर्व येथे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार

दुपारनंतर पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार असणार

Yavatmal: वणीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा निषेध, ठाकरे गट आक्रमक

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ यवतमाळच्या वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवासेना ठाकरे गटाच्या वतीने दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करित आतंकवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणाबाजी करून पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

Solapur: वाढत्या उन्हामुळे लिंबाची आवक घटली, आवक घटल्याने लिंबाच्या दरात झाली वाढ

सोलापुरात तापमानाचा पारा दिवासेंदिवस चाळीशीच्या पल्याड जात आहे.

त्यामुळे बाजारात लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येत आहे.मात्र मागच्या कांही दिवसात लिंबाची आवक घटली आहे.

यामुळे लिंबाच्या दरात विक्रमी प्रमाणात वाढ झाल्याच चित्र दिसून येत आहे. याची झळ सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागली आहे.

सध्या १ हजार रुपयाला १० किलो लिंबू तर किरकोळ बाजारात २० रुपयांना ३ लिंबू असा दर सुरु आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सफ्वसाधारणपणे ६ टन लिंबांची आवक होते.

मात्र मागच्या कांही दिवसांपासून ही आवक फक्त अडीच टनापर्यंत येऊन पोहोचली आहे.

Solapur: काश्मीरमध्ये 28 हिंदू पर्यटकांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोटमधील शिवसेना उबाठा झाली आक्रमक

अक्कलकोटमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानाची अंत्ययात्रा काढून नोंदवण्यात आला निषेध

यावेळी भगव्या टोप्या घालून मोठ्या संख्येने शिवसैनिक या अंत्ययात्रेत सामील झाल्याचे चित्र दिसून आले.

ही अंत्ययात्रा काढल्यानंतर शिवसैनिकांनी पाकिस्तानाच्या पंतप्रधानाच्या तिरडीला आग लावून राग व्यक्त केल्याचं दिसून आलं

Lonavala: पहलगाव येथे अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये जाहीर निषेध, सर्वपक्षीय निषेध सभेचे केले आयोजन

काश्मीर खोऱ्यामधील पहलगाव बैसरन घाटी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकावर केलेल्या बेचूट गोळीबारामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 24 पर्यटक जखमी झाले आहे.

पहलगाव येथील या अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये सर्व पक्ष्यांकडून जाहीर निषेध करण्यात आला.

लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्ष नागरिक यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभेचेही आयोजन करण्यात आले होते.

भारत सरकारने ठोस पावले उचलत या अतिरेक्यांचा अड्डा असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी या निषेध मोर्चाच्या दरम्यान सर्वपक्षीयांनी केली आहे..

आतंकवादी कृत्याच्या निषेधार्थ देहूरोड व्यापारी संघटनेच्यावतीने आक्रोश मोर्चा

काश्मीरच्या पहेलगाव येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध देहुरोड शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी शांततेची रॅली काढली.

या रॅलीत सहभागी व्यापाऱ्यांनी हातात फलक धरून शांततेचे आणि एकतेचे संदेश दिला..

कश्मीर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून पर्यटकावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला केंद्र शासनाने सर्वतोपरीने प्रयत्न करून या घटनेतील हल्लेखोरांना कठोर शासन करावे अशी मागणी सर्व व्यापाऱ्यांनी केली.

यावेळी देहूरोड शहरातील बाजारपेठेतून व्यापाऱ्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आपला आक्रोश व्यक्त केला.

दरम्यान सुभाष चौक येथे दोन मिनिटे मोन पाळत आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करून मेणबत्ती लावण्यात आली या रॅलीमध्ये शहरातील सर्व प्रतिष्ठित व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.