पहलगम दहशतवादी हल्ला: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा अटारी हा एकमेव जमीन व्यापार मार्ग बंद केला आहे. तसेच व्यापारावर बंदी घातली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय) नुसार, सीमा बंद केल्याने केवळ व्यापार बंद होणार आहे. मात्र, यामुळं मागणीत कोणतीही घट होणार नाही. याचा अर्थ असा आहे की पाकिस्तान भारत सोडून दुसऱ्या देशांद्वारे अप्रत्यक्षपणे भारतीय वस्तूंची आयात सुरु ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो.
GTRI ने असेही नमूद केले आहे की फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारी संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. त्यादरम्यान देखील भारताने कठोर पाऊल उचलले होते आणि व्यापाराच्या बाबतीत पाकिस्तानकडून मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला होता आणि पाकिस्तानी आयातीवर 200 टक्के पर्यंत उच्च आयात शुल्क देखील लागू केले होते. थोडक्यात, सीमा बंद झाल्यामुळे औपचारिक व्यापार थांबतो पण मागणी कमी होत नाही, असे GTRI ने सांगितले.
पाकिस्तान फक्त UAE आणि सिंगापूर सारख्या तिसऱ्या देशांकडून चढ्या किमतीत भारतीय वस्तू खरेदी करत राहील. पाकिस्तान औषध, रसायने, कापूस, चहा, कॉफी, रंग, कांदा, टोमॅटो, लोह, पोलाद, साखर, मीठ आणि वाहनांचे भाग या भारतीय वस्तू तिसऱ्या देशांमार्फत आयात करण्याची शक्यता आहे.
पुलवामा हल्ल्याबाबत भारताने केलेल्या कारवाईचा बदला म्हणून पाकिस्ताननेही भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली होती. तेव्हापासून, औपचारिक व्यापार मोठ्या प्रमाणात मर्यादित आहे. परंतू काही आवश्यक वस्तू जसे की औषधे भारतातून निर्यात करणे सुरु ठेवण्याची शक्यता आहे. अधिकृत माहितीनुसार, दोन्ही देशांमधील व्यापारावर औपचारिक बंदी असतानाही भारताने चालू आर्थिक वर्षात (एप्रिल 2024 ते जानेवारी 2025) पाकिस्तानला US 447.7 दशलक्ष डॉलर किमतीच्या वस्तूंची निर्यात केली.
याउलट, पाकिस्तानमधून भारताची आयात केवळ US0.42 दशलक्ष डॉलर इतकी नगण्य होती. US78,000 डॉलर किंमतीची अंजीर यांसारखी काही कृषी उत्पादने आयात केली गेली. तसेच US 18,856 डॉलर किमतीची तुळस आणि रोझमेरी सारख्या औषधी वनस्पती आयात केल्या गेल्या.
https://www.youtube.com/watch?v=ZDGM6M4MSOQ
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..