Khushboo Patani: दिशा पटानीच्या माजी लेफ्टनंट बहिणीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत; म्हणाली, ...तेव्हा युध्द हाच शेवटचा पर्याय!
Sarkarnama April 26, 2025 07:45 AM
Khushboo Patani दिशा पटानीची मोठी बहीण

खुशबू पटानी ही दिशा पटानीची मोठी बहीण असून ती भारतीय लष्करात कार्यरत होती. ती माजी लेफ्टनंट आहे.

Khushboo Patani 12 वर्षांच्या सेवेनंतर लेफ्टनंट पदावरुन रिटायर्ड

खुशबूनं देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. 12 वर्षांच्या सेवेनंतर आता ती लेफ्टनंट पदावरुन रिटायर्ड झाली असून एक फिटनेस कोच म्हणून कार्यरत आहे.

Khushboo Patani पुन्हा एकदा चर्चेत

ग्लॅमरपासून दूर असूनही खुशबू पटानी ही नेहमीची तिच्या सौंदर्यासह फिटनेसमुळे चांगलीच चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Khushboo Patani दहशतवादी हल्ल्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये एक व्हिडिओ आहे. यात ती चांगलीच संतप्त झाल्याचं दिसून येत आहे.

Khushboo Patani हा केवळ दहशतवादी हल्ला नाही,तर...

आता युद्ध झालं पाहिजे अशी आक्रमक भूमिका खुशबूनं मांडली आहे. तिच्या पोस्टमध्ये नेमकं ती काय म्हणते जाणून घेऊयात. माझं रक्त खवळत आहे. हा केवळ दहशतवादी हल्ला नाही,तर यामध्ये पाकिस्तानी लष्कराचा पूर्णपणे सहभाग आहे.

Khushboo Patani युद्ध हा शेवटचा पर्याय

पहलगाममध्ये काय झालं हे सर्वांना माहीत आहे आणि यालाच कलयुग म्हणतात. हे कलयुग आहे. असं म्हणतात की, युद्ध हा शेवटचा पर्याय असावा.

Khushboo Patani जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात...

जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा युद्ध लढलं जातं. मला वाटतं, आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत. 75 वर्षांपासून आम्ही पाकिस्तानी आणि पाकिस्तानला सहन करत आहोत. प्रेम आणि शांतीचे खूप नाटक झाले.

Khushboo Patani 15 लाखांहून अधिक जवान

भारतीय लष्करातील माजी मेजर म्हणून मी सांगू इच्छिते की, आपल्याकडे चांगली फौज आहे.15 लाखांहून अधिक जवान आहेत.आता युद्ध झालं पाहिजे. याचा फार विचार करायला नको. असा कोणता धर्म आहे,असे कोणते पुस्तक आहे ज्यामध्ये लिहिलं आहे की तुम्ही निरपराध लोकांना मारू शकता?

Khushboo Patani दहशतवादाविरुद्ध एकजूट...

खुशबू पटानीनं ही ती वेळ आहे, जेव्हा सर्व भारतीयांनी दहशतवादाविरुद्ध एकजुट व्हायला हवं आणि आपल्या देशात शांती आणि सौहार्द आणण्यासाठी सरकारच्या निर्णयांचं प्रामाणिकपणे समर्थन करायला हवं. चला, आपण सर्व एकजुट होऊन काम करू असंही म्हटलं आहे.

PM Narendra Modi Receives Global Support NEXT : जगभरातील 'या' 13 मातब्बर नेत्यांचा थेट मोदींना फोन; आता पाकिस्तानची खैर नाही...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.