Fd Rates : युनियन बँक ऑफ इंडियाने एफडी व्याजदर घटवले, जाणून घ्या किती व्याज मिळेल
ET Marathi April 26, 2025 03:45 PM
मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का दिला आहे. आरबीआयने रेपो दर कमी केल्यानंतर बँकेने त्यांचे एफडी दर कमी केले आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाने एफडीवरील व्याज ०.२५ टक्क्यांनी घटवले आहेत. बँकेचे हे नवीन दर २५ एप्रिल २०२५ पासून लागू झाले आहेत.ज्येष्ठ नागरिकांना सामान्य दरांपेक्षा ०.५०% जास्त व्याज मिळत आहे. बँक अति ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.७५ टक्के अधिक व्याज देत आहे. युनियन बँक ऑफ इंडिया सर्वसामान्यांना सात ते ४५ दिवसांच्या कालावधीच्या एफडीवर ३.५ टक्के व्याजदर देत आहे. आता, ४६ दिवस ते ९० दिवसांच्या कालावधीच्या एफडीवर ४.५० टक्के व्याजदर मिळत आहे.
३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील दर७-१४ दिवस - ३.५० टक्के१५-३० दिवस - ३.५० ३१-४५ दिवस - ३.५० ४६-९० दिवस - ४.५० ९१-१२० दिवस - ४.८०१२१-१८० दिवस - ५.००१८१ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी - ६.२५४०० दिवस - ६.९०१ वर्ष - ६.७५>१ वर्ष ते ३९८ दिवस - ६.७५३९९ दिवस - ६.७५४०१ दिवस आणि ४५५ दिवस - ६.६०४५६ दिवस - ७.१५४४७ वर्षे ते २ वर्षे - ६.६०> २ वर्षे ते ९९६ दिवस - ६.६०९९७ दिवस - ६.४०>९९८ दिवस ते ३ वर्षांपेक्षा कमी (९९९ दिवस वगळून) - ६.६०३ वर्षे - ६.७०> ३ वर्षे ते ५ वर्षे - ६.५०>५ वर्षे ते १० वर्षे - ६.५०