बांगलादेशमधील शेख हसीना सरकार गेल्यापासून त्या देशाच्या धोरणात खूप बदल झाला आहे. बांगलादेशमधील मोहम्मद युनूस सरकार कट्टरपंथी लोकांच्या दबावाखाली काम करत आहे. बांगलादेशची वाटचाल पाकिस्तानप्रमाणे होत आहे. पहलगाम हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंध कामालीचे तणावपूर्ण बनले आहे. त्याचवेळी पहलगाम हल्ल्यानंतर लश्कर ए तैयबाच्या एका बड्या नेत्याने कायदेशीर सल्लागार डॉ.आसिफ नजरुल यांची भेट घेतली. त्यामुळे बांगलादेश सरकार कट्टरपथींना प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील कट्टरपंथी आणि बांगलादेशातील अंतरिम सरकार यांच्यात जवळकी वाढत आहे. डॉ.आसिफ नजरुल आणि लश्कर ए तैयबाचा नेता इजहार या दोघांच्या भेटीसंदर्भात पूर्ण माहिती अजून मिळालेली नाही. इजहार हा लष्कर ए तैयबाचा दशतवादी आहे. तो बांगलादेशच्या भूमीवरुन दहशतवादी कारवायांचा कट आखत होता. त्यानेच 2009 मध्ये ढाकात भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर हल्ला करण्याची योजना तयार केली होती. त्यात त्याला अपयश आले. इजहार यांचे हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेसोबत चांगले संबंध आहे. हिफाजत-ए-इस्लाम एक देवबंदी इस्लामी समूह आहे. बांगलादेशने त्याच्यावर 2010 मध्ये बंदी आणली.
इजहार याच्यावर बांगलादेशमधील सुरक्षा संस्था 2009 पासून लक्ष ठेवून आहे. त्याने डॉ.आसिफ नजरुल यांची भेट घेतल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. हा प्रकार भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार आहे. सध्या या प्रकाराची चौकशी सुरु आहे. परंतु त्यात सत्य आढळल्यावर भारतासाठी चिंतेची गोष्ट असणार आहे. पाकिस्तान भारताविरोधात दुसरी आघाडी बांगलादेशच्या माध्यमातून उघड नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बांगलादेशात मोहम्मद यूनुस सरकार आल्यावर लश्कर-ए-तैयबाने आपला विस्तार केला. या संघटनेने कट्टरपंथी युवकांना जिहादच्या नावावर एकत्र करणे सुरु केले. लश्कर ए तैयबाच्या बांगलादेशमधील या हालचाली भारतासाठी आव्हान ठरणार आहे. यामुळे पूर्वोत्तर भारतात दहशतवादी कारवायांना वेग येण्याचा धोका आहे. बांगलादेशच्या मार्गाने पूर्वोत्तर भारतात पाकिस्तान शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांचे तस्करी करण्याचा धोका आहे.