एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, काल रात्री झालेल्या आंदोलनानंतर पूल बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळेच पुलावरून पुन्हा वाहतूक सुरू झाली आहे. जोपर्यंत स्थानिक रहिवाशांचे पुनर्वसन केले जात नाही आणि त्यांना विश्वासात घेतले जात नाही तोपर्यंत पुल बंद न करण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.
Jammu Kashmir : काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर गोळीबारकाल मध्यरात्री काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या काही चौक्यांवर गोळीबार झाला. भारतीय सैन्याने यावेळी योग्य प्रत्युत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे.
Devendra Fadnavis : पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; CM फडणवीसांचा पोलिसांना आदेशभारतातील पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. हेच सर्व पाकिस्तानी त्यांच्या देशात परतले की नाही यावर पोलिसांची बारीक नजर असून प्रत्येक पोलिस ठाण्याला त्याबाबत आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली आहे. शिवाय कोणत्याही परिस्थितीत हे पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाहीत याची शहानिशा केली जाईल असंही ते म्हणाले.
Waqf Amendment Bill : संसदेने मंजूर केलेला कायद्याला स्थगिती देऊ नका; वक्फबद्दल सरकारचे 1 हजार 332 पानांचे शपथपत्रवक्फ कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीचे समर्थन करताना केंद्र सरकारने संसदेने मंजूर केलेल्या या कायद्याला स्थगिती देण्यास शुक्रवारी विरोध केला. संसदेने मंजूर केलेल्या कायद्याला संवैधानिक कोंदण आहे, असेही सरकारने म्हटले आहे. हे खंडपीठ 5 मे रोजी अंतरिम निर्देश मागणाऱ्या याचिकांवर सुनावणी करेल.