आयपीएलच्या मॅचेस सुरू झाल्या की, काव्या मारन या नावाची प्रचंड चर्चा होते. या नावाभोवती मोठं ग्लॅमर निर्माण झालं आहे. 2018 पासून काव्या आणि आयपीएल असं एक समीकरण जुळलं आहे.
काव्या ही केवळ क्रिकेट जगतातील एक प्रसिद्ध व्यक्ती नाही, तर 2018 पासून सनरायझर्स हैदराबाद या आयपीएलमधील क्रिकेटची टीमची सीईओ आणि सह-मालक देखील आहे.
ती आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी अनेकदा स्टेडिअममध्ये हजर असते. तसेच आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावापासून टीमबाबत प्रत्येक निर्णयात तिचं बारकाईनं लक्ष असतं.
भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असूनही, प्रसिध्द उद्योजक कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांची मुलगी असलेल्या काव्यानं वैयक्तिक 409 कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती निर्माण केली आहे. मारन कुटुंबाची एकत्रित एकूण संपत्ती अंदाजे 2.3 अब्ज डॉलर्स इतकी असल्याचं बोलले जाते.
मॅचदरम्यानचा तिचा उत्साह आणि टीमसाठीचा सपोर्ट त्यामुळे तिची क्रेझ अवघी आयपीएल पुरतीच मर्यादित राहिलेली नसून क्रिकेट जगताबाहेरही तिला प्रचंड फॅन फॉलोईंग असल्याचं दिसून येतं.
काव्याला कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमीदेखील आहे. तिचे काका हे प्रसिध्द राजकारणी दयानिधी मारन हे आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच काव्याची जीवनशैली ही रॉयल असते.
काव्याने चेन्नईतील स्टेला मॅरिस कॉलेजमधून पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले. आणि त्यानंतर तिने यूकेमधील वॉरविक बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी मिळवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काव्याला आलिशान कारबद्दल प्रचंड आकर्षण आहे. तिच्याकडे लक्झरी कारचा मोठा संग्रह असल्याचीही माहिती आहे. जो तिच्या श्रीमंतचं प्रतीक आहे.
काव्याच्या नेतृत्वाखाली 2018 पासून हैदराबाद सनरायझर्सच्या कामगिरीचा आलेख उल्लेखनीय राहिलेला आहे. क्रिकेटबद्दलची तिची आत्मीयता ,झोकून देत काम करण्याची पध्दती तसेच व्यवसायाशी असलेली बॉण्डिंग कौतुकास्पद अशीच आहे.