>> नीलिमा प्राचार्य
जाळीदार नवीन कामाची संधी
चंद्र, गुरू युती, चंद्र बुध लाभयोग. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. भावनेच्या आहारी न जाता व्यवहारानुसार निर्णय ठरवा. नोकरीत प्रभाव वाढेल. नवीन कामाची संधी मिळेल. धंद्यात आळस, हलगर्जीपणा नको. व्यसनाने नुकसान. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. संयमी भूमिका घ्या. मैत्रीत गैरसमज. शुभ दिवस? 29, 30
वृषभ – तडजोड करावी लागेल
शुक्र, नेपच्यून युती, चंद्र, मंगळ लाभयोग. तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय मिळणे कठीणच. तरीही तुमचा प्रभाव दाखवण्याची संधी मिळेल. नवीन परिचय उत्साहात भर घालतील. नोकरीमध्ये तडजोड करावी लागेल. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना दुखवू नका. अभ्यासपूर्ण मुद्दे मांडा. शुभ दिवस? 2, 3
मिथुन – सहकार्य लाभेल
सूर्य चंद्र लाभयोग, शुक्र, नेपच्यून युती. प्रगतीची संधी शोधता येईल. अनेकांचे सहकार्य मिळवता येईल. डोळ्यांची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरीत महत्त्वाच्या कामात यश मिळेल. धंद्यात आळस नको. यांत्रिक बिघाडावर खर्च निर्माण होऊ शकतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ओळखी वाढतील. अनेक विषयांचे ज्ञान मिळेल. शुभ दिवस? 2, 3
कर्करोग कामाची प्रशंसा होईल
शुक्र, नेपच्यून युती, सूर्य, चंद्र लाभयोग. प्रत्येक कार्याला गतिमान करता येईल. क्षुल्लक कारणाने वाद वाढवू नका. संयम ठेवा. तुमचे महत्त्व सर्वत्र वाढेल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. परदेशगमनाची संधी मिळेल. धंद्यात उलाढाल होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद, अधिकार लाभेल. लोकप्रियता वाढविणारे कार्य होईल. शुभ दिवस? 28, 29
सिंह – प्रकृतीची काळजी घ्या
सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, मंगळ युती. मनावर दडपण येईल. जवळच्या व्यक्ती नाराज होतील. गैरसमज होईल. प्रकृतीची काळजी घ्या. दुखापत टाळा. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची कामे कराल. स्पर्धा करणारे वाढतील. धंद्यात फसगत टाळा. गुप्त कारवाया वाढतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परस्पर विरोधी घटना घडतील. शुभ दिवस? 28, 29
कन्या प्रत्येक दिवस यशदायी
चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, गुरू युती. प्रत्येक दिवस कठीण प्रसंगावर मात करून यश खेचणारा ठरू शकतो. मोठेपणाच्या आहारी न जाता सौम्य धोरण ठेवा. महत्त्व टिकवून ठेवा. नोकरीमध्ये वरिष्ठांची नाराजी होईल. धंद्यात लक्ष द्या. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. अंदाज चुकण्याची शक्यता. वरिष्ठांना दुखवू नका. शुभ दिवस? 29, 30
तूळ – अहंकार दूर ठेवा
सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, मंगळ युती. तुमच्या क्षेत्रात वर्चस्व वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. जवळच्या व्यक्ती, स्पर्धा करणारे लोक टीकात्मक चर्चा करतील. गुप्त कारवाया करतील. नोकरीमध्ये दगदग होईल. धंद्यात लेचेपेचे धोरण ठेवू नका. कुठेही अहंकाराचा दर्प येऊ देऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थोरांचे सहकार्य लाभेल. शुभ दिवस? 29, 1
वृश्चिक – विचारपूर्वक निर्णय घ्या
चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, गुरू युती. कठीण समस्या सोडवताना नम्रतापूर्वक विचार मांडा. मोठेपणाच्या भावनेतून कोणतेही वक्तव्ये करू नका. कायदा पाळा. नोकरीत धावपळ होईल. धंद्यात गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप येईल. गुप्त कारवाया वाढतील. कुणालाही कमी लेखू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. शुभ दिवस? 29, 30
धनु – वर्चस्व वाढेल
सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, शनि युती. तुमच्या क्षेत्रातील समस्या सोडवता येतील. रागावर ताबा ठेवा. वाहनाचा वेग कमी ठेवा. नोकरीत वरिष्ठांच्या कामात साहाय्य केल्याने वर्चस्व वाढेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिमा उजळेल. विरोधक मैत्रीची भाषा करतील. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. शुभ दिवस? 1, 2
मकर नोकरीत काम वाढेल
चंद्र, बुध लाभयोग, शुक्र, शनि युती. तुमचे कौतुक करून तुमच्यावर नवी जबाबदारी टाकण्यात येईल. गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. कलाक्षेत्रात कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल. नोकरीत काम वाढेल. सहकारी मदत करतील. मात्र राग वाढू देऊ नका. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अभ्यासपूर्ण बोला. शुभ दिवस? 29, 30
कुंभ – नवा मार्ग मिळेल
सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, शनि युती. विविध क्षेत्रातील व्यक्तींचा परिचय होईल. उत्साह, आत्मविश्वासात भर पडेल. प्रगतीचा नवा मार्ग शोधता येईल. नोकरीच्या कामात बढती होईल. धंद्यात वाढ होईल. कर्जाचे काम करून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जटील समस्या सोडवण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. शुभ दिवस? 28, 1
मीन – गुंतवणूक वाढवा
शुक्र, शनि युती, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. तुमच्या धाडसाचे, कामाचे सर्वत्र कौतुक होईल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची नवी संधी मिळेल. नोकरीत मनाप्रमाणे बदल, बढती होईल. गुंतवणूक वाढवा. खरेदीविक्रीत फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिमा उजळेल. पद, अधिकार यामुळे वर्चस्व वाढेल. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. चांगला दिवस 29, 30